Thursday, May 9, 2024

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चेहऱ्यावर नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावून महाराजांचा अपमान करणाऱ्यावर कारवाई करावी पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी,




नांदगाव (प्रतिनिधी ) - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चेहऱ्यावर नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावून महाराजांचा अपमान करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी नाशिकच्या नांदगाव शहरातील शिवकन्या संगिता सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली येथील शिवप्रेमींनी निवेदनाद्वारे केली आहे. सबंध महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे पंचप्राण असलेले आणि आमचा मान अभिमान असलेले हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चेहऱ्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावून नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखे बनवण्यात आले आहे . यामुळे शहरातील शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. पंतप्रधान मोदीच काय जगातील कोणताही व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज यांची बरोबरी करू शकत नाही. यामुळे विवेक त्रिवेदी या फेसबुक वापरकर्त्यावर व त्याच्या टूर कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी असे निवेदन नांदगाव पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार राजू मोरे यांना दिले आहे. यावेळी निवेदन देताना शिवकन्या संगीता सोनवणे, फुले शाहू आंबेडकर विचाराचे फिरोज शेख,सुमित सोळशे,  तुषार चव्हाण,स्वराज्य शर्मा,राहुल पैठणकर, विकास शर्मा,मयूर कुलकर्णी, रवी कुलकर्णी, हर्ष पांडे,गौरव वर्देकर काजी वसीम आदी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

न्यू इंग्लिश विद्यालयात 'जागतिक महिला दिन' उत्साहात साजरा,

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल  मध्ये 'जागतिक महिला दिन' मोठ्या उत्साहात...