Monday, May 13, 2024

नांदगाव येथील मविप्र संस्थेत आय.टी.आय इलेक्ट्रिशियन नवीन तुकडी मंजूर,





नांदगाव( प्रतिनिधी) - मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदगाव (आय.टी.आय.,) येथे इलेक्ट्रिशियन या ट्रेडची नवीन तुकडी मंजूर झालेली असुन चालू शैक्षणिक वर्षापासून २० ऐवजी ४० जागा प्रवेशासाठी उपलब्ध होणार आहेत.या  अभ्यासक्रमासाठी डीजीटी नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र शासनाची मान्यता प्राप्त झालेली आहे. डीजीटी नवी दिल्ली येथील पथकाने जूलै २०२३ मध्ये प्रत्यक्ष पाहणी करून उपलब्ध भौतिक सोयी सुविधांच्या आधारावर मे-२०२४ मध्ये सदर इन्सपेक्शन अहवाल सादर करण्यात आला. आय.टी.आय, नांदगाव येथे इलेक्ट्रिशियन ही तुकडी सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. आय.टी.आय नांदगाव येथे सद्यस्थितीत इलेक्ट्रिशियन फिटर व वेल्डर हे तीन ट्रेड सुरु असून,  या वर्षांपासून इलेक्ट्रिशियन या विभागाची नव्याने तुकडी सुरु करण्यासाठी परवानगी मिळाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. यावर्षी नांदगाव आय.टी.आय ला २५ वर्ष पूर्ण झालेली असून मविप्र तालुका संचालक इंजि.अमित उमेदसिंग बोरसे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्या मुळे नांदगाव शाखेस नूतन इमारत मंजूर झालेली असून , येत्या ६ ते ८ महिन्यात नवीन इमारत देखील प्रशिक्षणासाठी उपलब्ध होणार आहे. नवीन ट्रेड ला मंजुरीसाठी तसेच नुतन इमारत मंजूर करण्यासाठी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे,पदाधिकारी, संचालक मंडळ व शिक्षणाधिकारी यांनी मान्यता दिल्याबद्दल तसेच भौतीक सुविधा वेळच्या वेळी प्राप्त करून दिल्याबद्दल तालुका संचालक इंजि. अमित बोरसे-पाटील तसेच मविप्र आय.टी.आय, नांदगावचे प्राचार्य बी.बी.आथरे व सेवकवृंदानी आभार मानले.

No comments:

Post a Comment

नांदगाव नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती व सदस्यांची निवड,

नांदगाव (प्रतिनिधी ) - येथील नांदगाव नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती व सदस्य निवडीसाठी नगरपरिषद कार्यालयात विशेष सभ...