Thursday, June 13, 2024

नांदगाव येथील होरायझन अकॅडमीत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत, शाळेत विद्यार्थ्यांना सीबीएससी माध्यमातून शिक्षण मिळणार!!






नांदगाव (प्रतिनिधी) - नाशिक मराठा विद्या प्रसारक समाजाचे, होरायझन अकॅडमी, नांदगावचा   पहिला दिवस या निमित्त विद्यार्थ्यांचे होरायझन अकॅडमीच्या वतीने स्वागत करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थी शाळेच्या गेटमध्ये आल्यानंतर प्राचार्या श्रीमती पुनम डी मढे यांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन तसेच मुलांचे औक्षण करून स्वागत केले. शाळेचा पहिला दिवस असल्याकारणाने विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते. यावेळी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन न्यू इंग्लिश स्कूल, नांदगाव शाळेचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व्ही.वाय.काकळीज यांनी प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. तसेच कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्राचार्या श्रीमती पुनम डी. मढे. यांनी केले. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. तसेच शाळेच्या प्राचार्या श्रीमती पुनम डी. मढे . यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. होरायझन अकॅडमी विषयी संपूर्ण माहिती त्या प्रास्ताविक भाषणामध्ये सांगितली. पहिलाच दिवस असल्याकारणाने विद्यार्थ्यांना गाणे गोष्टी तसेच शालेय अभ्यासक्रमाविषयी शाळेच्या प्राचार्या यांनी माहिती सांगितली. या कार्यक्रमासाठी मविप्र समाज संस्थेचे नांदगाव तालुका संचालक इंजि. अमित  बोरसे-पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा खांडेकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

No comments:

Post a Comment

नांदगाव नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती व सदस्यांची निवड,

नांदगाव (प्रतिनिधी ) - येथील नांदगाव नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती व सदस्य निवडीसाठी नगरपरिषद कार्यालयात विशेष सभ...