नांदगाव( प्रतिनिधी) - नांदगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील कामगार वसाहती पत्रकार महेश पेवाल यांच्या घरावर पिंपळाचे झाड कोसळून घराचे मोठे नुकसान झाले . यात अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. नांदगाव शहर व परिसरात रविवार पासुन हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो आहे. दुपारीच्या सुमारास पावसाला सुरुवात होताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील कामगार वसाहतीतील पत्रकार महेश पेवाल यांच्या घराला लागून असलेले पिंपळाचे झाड कोसळुन घराचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी पेवाल यांच्या घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच नगर पालिकेचे अधिकारी राहूल कुटे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व पाहणी करून पालिकेच्या आपत्कालीन विभागाला सूचना करून ते झाड तात्काळ काढून घेण्यासाठी सूचना केल्या . याशिवाय तहसीलदार सुनील सौदाणे यांनीही तात्काळ दखल घेऊन तलाठी शिरसाठ यांना पंचनामा करण्यासाठी पाठवले. तलाठी शिरसाठ यांनी पंचनामा केला असून अंदाजे अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये घरातील संसारपयोगी वस्तू, कपाट, फ्रिज, टि.व्ही. घरघंटी, भांडे, घराचे पत्रे, घराची भिंत कोसळल्याने अन्नधान्य यांचे नुकसान झाले आहे. झाड कोसळत असताना पेवाल यांचे मोठे बंधू, वहिनी, आई घरात विश्रांती घेत होते. घराची भिंत कोसळत असल्याचे पाहताच त्यांनी वृध्द आईला घेऊन घराबाहेर पळाले . यामुळे सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती व सदस्यांची निवड,
नांदगाव (प्रतिनिधी ) - येथील नांदगाव नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती व सदस्य निवडीसाठी नगरपरिषद कार्यालयात विशेष सभ...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...
No comments:
Post a Comment