Sunday, August 25, 2024

नांदगाव शहरात भव्य स्वयं रोजगार निर्मिती, प्रदर्शन व रोजगार मेळाव्याचे आयोजन,





नांदगाव (प्रतिनिधी ) -  सद्यस्थितीत ११० कंपन्या आमच्याशी संर्पक साधून आहेत, मात्र आम्ही ५०० कंपन्याना जोडून घेण्याचे लक्ष्य ठेवले आहे. जेणेकरून मतदार संघातील प्रत्येक घरातील माझ्या भगिनींना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणे शक्य होईल. असे प्रतिपादन आमदार सुहास कांदे यांनी केले.
. नांदगाव शहरातील हनुमाननगर येथील आमदारांच्या देवाज बंगल्यावर मतदार संघातील महिला भगिनींच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी भव्य स्वयं रोजगार निर्मिती, प्रदर्शन व रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना आमदार श्री. कांदे बोलत होते.
     यावेळी व्यासपीठावर या उपक्रमाच्या प्रणेत्या समाजसेविका सौ.अंजुम कांदे, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख विद्या जगताप, मनमाडचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी, तालुका अधिकारी डॉ. संतोष जगताप, राजेंद्र पवार,अश्विनी जाधव, लीना पाटील,रोहिणी मोरे, संगीता बागुल, राहुल कुटे, राजेंद्र भाबड, दत्तू निकम, अनिल रिंढे, दीपक मोरे आदी उपस्थित होते.
. ' ज्या कंपन्या आपल्याशी जोडल्या जाणार आहेत, त्यांच्याशी आपण पाच वर्षाचा करार करणार असून, दरवर्षी जशी कच्चा मालात वाढ होईल. अगदी त्याचप्रमाणे जो पक्का माल तुम्ही तयार कराल त्याच्या रकमेत ही वाढ करण्याची अट या करारात असेल. असे स्पष्ट करून आ. श्री. कांदे पुढे म्हणाले की, इतकेच नाही तर कच्चा मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्यासाठी जी मिशनरी लागणार आहे,ती घेण्यासाठी १०० टक्के कर्जपुरवठा आम्ही करणार आहोत.तुमचे सिबिल कमी असो वा जास्त कर्ज घेण्यास कुठलंही अडचण येणार नाही. आणि कच्चा माल घेण्यासाठी ठेव द्यावी लागते. पण तुम्हाला त्याची चिंता करण्याची गरज नाही. कारण ते सर्व पैसे सौ. अंजुम कांदे ह्या देतील.आलेल्या उत्पनातून याची परतफेड तुम्हाला करावी लागेल.आणि मी खात्रीने सांगतो की, फक्त तीन वर्षात ह्या मशीन ची पूर्ण रक्कम तुम्ही फेडून टाकाल व हे मशीन तुमच्या मालकीचे होईल.उत्कृष्ट उत्पादन व उत्पन्न घेणाऱ्या बचत गटाना पुरस्कार देण्यात येतील. असे ही आमदार कांदे यावेळी सांगितले.
. या स्वयं रोजगाराच्या प्रणेत्या सौ. अंजुम कांदे उपस्थित महिलांना उद्देशून म्हणाल्या की, तुमच्या भरवश्यावर ही इतकी मोठी धाडसी उडी घेतली आहे. आणि यात जी गुंतवणूक करणार आहोत. त्यात शासनाचा एक रुपया ही नाही. सर्व स्वनिधी आहे. आणि आपल्या आमदारांनी तुमच्या आर्थिक संपन्नतेसाठी हे पैसे आपल्याला उसने दिले आहेत. त्यामुळे आपणही तितक्याच जबाबदारीने काम करून अण्णांचा विश्वास सार्थ ठरवायचा आहे. अन आपली,कुटूंबाची प्रगती साधायची आहे. स्त्री पुरुष तुलना करत बसण्यापेक्षा कुटूंबाचे हित जोपासून आर्थिक उन्नती साधायची आहे.या स्वयं रोजगारातून प्रत्येक महिलेला दर दिवशी किमान २०० ते २५० रुपये कमावता येतील. असेच उद्योग आपण निवडले आहेत.असे सौ. कांदे म्हणाल्या.
. याप्रसंगी अँड. विद्या कसबे, हसीना शेख, ज्योती महाजन, सुनीता कदम, सविता नवले, श्री. महिरे, यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच सौ. कांदे यांचा वाढदिवस यावेळी हजारो महिलांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
. मेळाव्यानंतर शहरातील गुप्ता लॉन्स येथील कच्चा मालाचे पक्क्या मालात रूपांतर करणाऱ्या मशीन प्रदर्शनाचे उदघाट्न आमदार सुहास कांदे व सौ. अंजुम कांदे यांचे हस्ते करण्यात आले. व यावेळी या सर्व मशीनची आमदार पती -पत्नी व सर्व महिलांनी पाहणी करून वापराबाबतची तपशीलवार माहिती जाणून घेतली.यात कापूर, अगरबत्ती, कापूस वात, डाळ मिल, पत्रावळी, टिशू पेपर, सोलर ड्रायर, केळी चिप्स, पापड, ऑफसेट, आईस्क्रीम, ऊस रसवंती, आटा चक्की, मिर्ची ग्राईडर, स्क्रबर, पॉपकॉर्न, शेवई, आदीसह शेकडो मशीन चे प्रदर्शन भरवण्यात आले होते. हे प्रदर्शन अजून दोन दिवस सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळात पाहण्यासाठी खुले असणार आहे.
. यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख फरहान खान, ज्ञानेश्वर कांदे, किरण कांदे, अप्पा कांदे, सागर हिरे, शशी सोनावणे, सुनील जाधव, लाला नागरे, भावराव बागुल,प्रकाश शिंदे,आदीसह शिवसेना महिला आघाडी, पदाधिकारी, युवासेना, तसेच मतदार संघातून आलेल्या हजारो महिला, बचत गटाच्या सदस्या, आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रास्ताविक राजेंद्र देशमुख यांनी केले, तर सूत्रसंचालन संजय आहेर यांनी केले.

नांदगावतील नवीन इदगाह व शादीखानाचे आमदार सुहास कांदे यांचे हस्ते उद्घाटन,




नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांच्या सौ. अंजुम कांदे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून नांदगाव शहरात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या इदगाह व शादीखाना चे उदघाट्न सौ. अंजुम सुहास कांदे यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी अध्यक्षपदावरून ते बोलत असताना, '  जी मुस्लिम कुटुंबं गरीब आहेत, त्यांच्या ही मुलामुलींची लॉन्स मध्ये लग्न करण्याची इच्छा असतेच ना, म्हणून हा शादीखाना उभारून दिलाय. आता या आलिशान शादीखाना मध्ये गरीब मुस्लिम बांधवांच्या मुलामुलींची लग्ने आता फक्त १०१ रुपयात लावली जातील. तशी व्यवस्था करण्यात आली आहे. असे प्रतिपादन आमदार सुहास कांदे यांनी केले.
     यावेळी व्यासपीठावर सौ. अंजुम कांदे, फरहान खान, इकबाल शेख,शाईनाथ गिडगे, अल्ताफबाबा खान, मयूर बोरसे, सुनील हांडगे, महेंद्र शिरसाठ, सौ. उज्वला खाडे, रोहिणी मोरे, सुजाता कातकडे, ज्ञानेश्वर कांदे, बबलू पाटील, अमजद पठाण,जाफर मिर्झा, असिफ पठाण, रफिक पठाण, हाजी मुनावर, आदी सह जेष्ठ मुस्लिम बांधव उपस्थित होते.
       आमदार सुहास कांदे पुढे म्हणाले की, सौ. अंजुम च्या वाढदिवस निमित्त या शादी खाना साठी सुमारे ६० लाख रुपयांची स्वयंपाकासाठी भांडी, टेबल, खुर्च्या दिल्या आहेत. आणि या भांड्यांसाठी कुठलेही भाडे आकारले जाणार नाही. याउलट दरवर्षी १० गरीब लोकांच्या मुलामुलींच्या लग्नाचा खर्च मी स्वतः करेन. ह्या शादी खाना च्या दुमजली इमारतीचा प्रस्ताव ही मंजूर झाला असून, येत्या आठ दिवसात ते काम व येथे पेव्हर ब्लॉक, संपूर्ण संरक्षक कंपाउंड ही बांधून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
    माझ्या मतदार संघातील सर्व हिंदू बांधव व मुस्लिम बांधव एकोप्याने राहत आहेत. त्यांच्यात धर्मावरून कधीच वाद मी होऊ देणार नाही. व दोघांपैकी कुणावर ही अन्याय होणार नाही. याची सतत काळजी मी घेईन. तसेच मतदार संघातील ज्या ज्या गावात मुस्लिम बहुल वस्ती आहे, त्या प्रत्येक ठिकाणी शादी खाना व ईदगाह बांधून दिले आहेत. असे ही आ. कांदे शेवटी म्हणाले.
     तर सौ. कांदे म्हणाल्या की,माझे आजोबा नांदगाव मध्ये अनेक वर्षे वास्तव्य करून होते.येथील मुस्लिम बांधवांच्या समस्याकडे आज पर्यंत कुणीच लक्ष दिले नाही. मात्र आपले आमदार जात पात, धर्म भेद मानत नाही. म्हणून सर्वच जाती धर्माच्या घटकांना सोबत घेऊन विकासकामे करत आहेत. यावेळी हाजी मुनावर, अँड. युनूस शेख, अय्याज शेख, शबाना शेख, बब्बू शेख, रियाज पठाण,आदीनी मनोगत व्यक्त केले.
     कार्यक्रमास प्रमोद भाबड,सागर हिरे, सुनील जाधव, बापू जाधव,आदीसह आ. सुहास अण्णा कांदे रहेनुमा फाउंडेशन चे अध्यक्ष सईद हाजी,सचिव अय्याज शेख,कार्याध्यक्ष रियाज पठाण,सदस्य वसीम खान, नईम शेख, इकबाल शेख, समन्वय समिती सदस्य हाजी मुनव्वर पठाण,हाजी जहीर,इकबाल दादा शेख,ॲड युनूस शेख,लतिफ सुफर,चिराग सेठ,खलील जनाब आदी सह हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते.

नांदगाव येथील विद्यालयात 'अत्याधुनिक संगणक लॅब' तून विद्यार्थ्यांना संगणकीय धडे मिळणार,

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील नाशिक शिक्षण प्रसारीत मंडळ संचलित स्व. मिश्रीलाल  भिकचंद छाजेड विद्यालयात नूतनीकरण करण्यात ...