Saturday, March 7, 2026

न्यू इंग्लिश विद्यालयात 'जागतिक महिला दिन' उत्साहात साजरा,







नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथील मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल  मध्ये 'जागतिक महिला दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयातील सर्व महिला शिक्षिका व पोषण आहार कक्षाचे महिला कर्मचारी यांचा पेन, पुस्तक आणि गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला.
        कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. स्त्रीशक्तीचा सन्मान करण्याच्या उद्देशाने, विद्यालयाच्या वतीने प्रत्येक महिला कर्मचाऱ्याला ज्ञानाचे प्रतीक म्हणून पुस्तक, लेखणीचे प्रतीक म्हणून पेन आणि स्नेहाचे प्रतीक म्हणून गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
       कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून सांस्कृतिक समिती प्रमुख शरद आहेर यांनी महिला दिनाचा उद्देश व ८ मार्च हा दिवस 'जागतिक महिला दिन' म्हणून का साजरा करण्यात येतो हे सांगितले.
             यावेळी बोलताना विद्यालयातील उपशिक्षक वासुदेव कवडे महिलांच्या समाजातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. "आजच्या युगात महिला सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहेत. घरातील जबाबदारी सांभाळून शैक्षणिक क्षेत्रात त्या देत असलेले योगदान कौतुकास्पद आहे," असे विचार त्यांनी मांडले. केवळ एक दिवस नव्हे, तर वर्षभर महिलांचा सन्मान राखणे हीच काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
             कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषणात बोलताना मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी सांगितले की, "स्त्री ही कुटुंबाचा आणि समाजाचा कणा आहे. शिक्षिका म्हणून त्या भावी पिढी घडवण्याचे पवित्र कार्य करत आहेत. त्यांच्या या कार्याला बळ देण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असते."
    हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विद्यालयातील सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद आहेर यांनी तर आभार बाळासाहेब कवडे यांनी मानले.




No comments:

Post a Comment

न्यू इंग्लिश विद्यालयात 'जागतिक महिला दिन' उत्साहात साजरा,

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल  मध्ये 'जागतिक महिला दिन' मोठ्या उत्साहात...