Friday, September 20, 2024

नांदगाव शहरात ईद-ए-मिलाद निमित्त शांतीपूर्ण शोभायात्रा, मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित,






नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव शहरात ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त काढण्यात आलेल्या आकर्षक मिरवणुकीने नांदगाव शहरात दणाणुन गेले  होते. मिरवणुकीनतंर  ‘या अल्लाह जगात शांतता नांदू दे, देशात एकात्मता नांदू दे , देश महासत्ता होवू दे’ अशी प्रार्थना करत मुस्लिम समाज बांधवांतर्फे अल्लाहला कडे प्रार्थना करण्यात आली. सुन्नी जामा मस्जिद व अहेले सुन्नत वल जमाअत व जमात रजा-ए-मुस्तफा नांदगाव तर्फे सकाळी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले  होते.मुस्लिम समाज बांधवांचा सर्वात पवित्र सण ईद-ए-मिलादुन्नबी बुधवार साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळी नऊ वाजता नांदगाव एच् .आर. हायस्कूल कोट गल्ली जामा मस्जिद येथून  मिरवणुकीची सुरुवात झाली.त्यानंतर मुख्य मार्गाने कालीका चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौका , शनी मंदिर येथून हुतात्मा चौक,  डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक,  महात्मा गांधी चौक,  महात्मा फुले चौक , दत्त मंदिर तसेच गावातील मुख्य रस्त्याने परत एच्. आर. हायस्कूल येथे समारोप करण्यात आला. ठिकठिकाणी  शोभायात्रेचे स्वागत करण्यात येवून गोड पदार्थाचे वाटप करण्यात आले असून तसेच मिरवणुकीत सहभागी बांधवांकडून घोषणा देण्यात येत होत्या. तसेच ध्वनी प्रक्षेपकावरुन नातपाक व सलातो सलामचे पठण करण्यात येत  होते. मिरवणुकपूर्वी कार्यक्रम प्रसंगी नांदगाव पोलीस स्टेशनचे यांच्या सह पोलिस उपनिरीक्षक यांच्या पोलिस अधिकारी कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
 या प्रसंगी अध्यक्ष मुज्जमील शेख,  उपाध्यक्ष मोसीन डाफेदार , कलिम शेख,  ग्यासोद्दीन शेख,  समिर पठाण,  शाकीर पठाण,  माजी नगरसेवक याकुब शेख, माजी नगरसेवक एकबाल शेख , नासिर पठाण , शरीफ शेख,  शकूर शेख, सेक्रेटरी मदरसा बबलू सय्यद  , दाऊद गणी शेख शरीफ, पिंजारी समाज अध्यक्ष  मन्सुरी  आदीसह मुस्लीमबांधव , बाळगोपाळ उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...