नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथील
व्ही.जे. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी व हरित सेनाप्रमुख, पर्यावरणप्रेमी ए.पी.सोनवणे सर यांनी शालेय परिसरातील झाडांमध्ये अडकलेला नायलॉन मांजा तसेच अडकलेल्या पतंग देखील काढल्या.
मकर संक्रांत या दिवशी अनेक पतंग प्रेमी पतंग उडवत असतात. पतंग उत्सवाचा आनंद लुटत असतात. परंतु त्यावेळेस कापले गेलेले किंवा तुटलेले पतंग हे झाडांमध्ये अडकून बसतात.झाडांमध्ये अडकलेल्या नायलॉन मांजामुळे पक्षांचे पंख छाटले जातात. त्यांच्या जीवाला धोका असतो. ही बाब लक्षात घेऊन व्ही. जे .हायस्कूलच्या हरित सेनाप्रमुख,पर्यावरणप्रेमी श ए.पी.सोनवणे सर यांनी हा उपक्रम राबवला.
नायलॉन मांजा हा पक्षी, प्राणी तसेच मानवाला कशाप्रकारे हानिकारक आहे हे देखील त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
रस्त्यावर निघताना किंवा सायकल/वाहन चालवताना गळ्यात दुपट्टा किंवा रुमाल बांधूनच प्रवास करावा हे देखील त्यांनी विद्यार्थ्यांना आवर्जून सांगितले..
नायलॉन मांजा वापरणार नाही, विद्यार्थांनी घेतली शपथ!!
- मी पतंग उडवितांना नायलॉन मांजा वापरणार नाही, इतर कोणालाही नायलॉन मांजा वापरू देणार नाही’, या आशयाची शपथ विद्यार्थ्यांना हरित सेना प्रमुख श्री सोनवणे सर यांनी ८ जानेवारी रोजी दिली..
येथील सोनवणे सरांच्या या उपक्रमाचे व विद्यार्थ्यांचे नांदगाव संकुल प्रमुख तथा शालेय समिती अध्यक्ष संजीव धामणे सर, शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मीकांत ठाकरे सर, उपमुख्याध्यापक श्री खंडू खालकर , पर्यवेक्षक श्रीवास्तव सर, मधे सर ,शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी कौतुक केले.
No comments:
Post a Comment