Saturday, February 1, 2025

परिक्षा केंद्रावर बुरखावर बंदी करू नये, नांदगावच्या उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांची मागणी,




नांदगाव ( प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्यात दहावी एसएससी बोर्डाच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. त्याआधी मंत्री नितेश राणेंनी शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. पत्रात परीक्षेला बुरखा घालून येणाऱ्यांवर बंदी आणावी अशी मागणी केली आहे. राणेंनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र लिहून ज्या मुली बुरखा घालून परीक्षेला येतील त्यांना केंद्रावर प्रवेश देऊ नये असं म्हटलं आहे. यांवर आता बुरखा घालणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. नांदगावच्या उर्दू शाळेतील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, इस्लाम धर्मात स्त्रीयांना बुरखा घालणे गरजेचे आहे . परिक्षा दालनात बुरखावर बंदी करू नये . परिक्षा जवळ येत असताना अशा वक्तव्यामुळे अभ्यासात दडपण येऊन आमच्या परिक्षेत परिणाम दिसून येणार असं मत विद्यार्थ्यांनी दिलं आहे. तसेच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यांवर बोलताना बुरखा असो किंवा नसो कोणीही विद्यार्थी कॉपी करणार नाही. परिक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात असेल अशी माहिती त्यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...