Thursday, February 20, 2025

उद्या इयत्ता दहावीची परीक्षा, नांदगाव तालुक्यातील विविध केंद्रांवर परीक्षेचं आयोजन,




नांदगाव (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची एसएससी (इयत्ता १०वी) ची परीक्षा उद्या (ता. २१) पासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी नांदगाव तालुक्यातील परीक्षार्थीं परिक्षा देणार आहेत . परीक्षा कालावधीत अनावश्यक लोकांनी परीक्षा केंद्र परिसरात फिरकू नये. विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर शांतता ठेवावी अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा शिक्षण प्रशासनाने कडून दिला आहे. 
   इयत्ता १२ वी प्रमाणेच इयत्ता १०वीची परीक्षाही कॉपी मुक्त वातावरणात व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. परिक्षा केंद्रावर परीरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कॉपीचे प्रकार थांबवण्यासाठी भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. कॉपीमुक्त अभियानासाठी दक्षता समिती तयार करण्यात आली आहे.    राज्य परीक्षा मंडळाकडून  भरारी पथके नियुक्त केली आहेत. या शिवाय जिल्हाधिकारी स्तरावरून विशेष भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.  परीक्षा मंडळाकडून तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थींची सरमिसळ करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,

नांदगाव (प्रतिनिधी ) -  शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....