Monday, February 10, 2025

आजपासून एचएससी १२वी परिक्षेला सुरुवात होणार, नांदगाव केंद्राची बारावी परीक्षेची आसनव्यवस्था जाहीर,






नांदगाव ( प्रतिनिधी) -  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेची नांदगाव केंद्र क्रमांक 0220 ची आसन व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे. आज मंगळवारी दि. ११ फेब्रुवारी पासून सुरू होत असलेल्या बारावीच्या परीक्षेसाठी नांदगाव,भालूर व साकोरे येथील कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रविष्ट होत आहेत. या परीक्षेची आसनव्यवस्था कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,नांदगाव च्या इमारतीत करण्यात आलेली आहे. या एच.एस.सी. परीक्षा केंद्रात विज्ञान शाखेचे आसन क्रमांक S022491 ते S022781,  कला शाखेचे आसन क्रमांक S101238 ते S101528 तर वाणिज्य शाखेचे आसन क्रमांक S153564 ते S153657 असे  परीक्षा केंद्राचे एकूण 675 परीक्षार्थी विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी याची सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी अशी माहिती महाविद्यालयाकडुन देण्यात आली आहे. परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षेला येताना वेळापत्रकातील वेळेच्या तीस मिनिटे आधी परीक्षा केंद्रात वेळेत उपस्थित राहावे. परीक्षेला येताना कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह साहित्य सोबत आणू नये असे आवाहन केंद्र संचालक जी.व्ही.बोरसे व प्राचार्य डॉ. आर‌. एन.भवरे यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

न्यू इंग्लिश विद्यालयात 'जागतिक महिला दिन' उत्साहात साजरा,

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल  मध्ये 'जागतिक महिला दिन' मोठ्या उत्साहात...