नांदगाव (प्रतिनिधी) - ज्या प्रमाणे मराठीत म्हण आहे, "मुलगी शिकली ,प्रगती झाली" त्याप्रमाणे घरातील कुटुंब प्रमुख महिला निरोगी तर संपूर्ण कुटुंब निरोगी ही म्हण प्रचलित करण्याची गरज आहे . विशेषतः घरकाम करता करता बाहेरील नोकरी व्यवसाय करणाऱ्या महिलांनी विषेश काळजी घेणे गरजेचे आहे. त्यानी स्वतः उत्तम आहार व्यायाम आणि आराम करणे गरजेचे आहे. कारण कुटुंबातील महिला निरोगी असेल तर संपूर्ण कुटुंब निरोगी राहील असे स्पष्ट मत डॉ काजल तुसे यांनी व्यक्त केले. आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती संभाजी महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले व महिलांनी विशेष काळजी घ्यावी . स्वतःसाठी जगावे कारण घरातील महिला जशी असेल तसेच घरातील व्यक्ती व घरातील मुलांवर संस्कार असतात असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्ष सौ संगिता सोनवणे या होत्या.
नांदगाव येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त जयंतीनिमित्त कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. काजल तुसे बोलत होत्या. यावेळी संस्थेच्या सचिव आशाबाई काकळीज यांच्यातर्फे त्यांचा संविधान उद्देशिका देऊन सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. तुषे यांच्या हस्ते संविधान उद्देशिका देऊन महिलांचा सन्मान करण्यात आला.महिलांचे एवढे मोठे संघटन व कार्य बघुन डॉ. तुषे यांनी कौतुक केले. संस्थेच्या अध्यक्ष सौ. संगिता सोनवणे यांनी संस्थेच्या कार्याबद्दल माहिती देतांना सांगितले की सध्या देशातील वातावरण बघुन आम्ही सर्व महापुरुषांच्या जयंती साजरी करून त्यांचे विचार जास्तीत जास्त प्रसार करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.तसेच महिलांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे सांगितले.यावेळी महिलांनी देखील आपल्या अडचणी सांगुन मत व्यक्त केले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशा काकळीज , सरला मोढे, वंदना बहिकर, रत्ना सोनवणे, शोभा भोसले, तबसूम शेख,तारा निकम, जोती मोरे, संगीता मोकळ, अलका आयनोर यांच्यासह ग्रामीण भागातील महिलांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment