नांदगाव (प्रतिनिधी) - नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघांचे लोकप्रिय आमदार सुहासअण्णा कांदे यांची महाराष्ट्र शासनाच्या 'भटक्या - विमुक्त विकास समिती' च्या अध्यक्षपदी नुकतीच सन्मानपूर्वक नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाच्या 'भटक्या - विमुक्त विकास समिती'च्या अध्यक्षपदाला राज्यमंत्र्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. आमदार सुहासअण्णा कांदे हे
'राष्ट्रीय सरपंच संसदे'चे जिवलग स्नेही आहेत.
१५ एप्रिल रोजी 'एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट' अंतर्गत स्थापित 'राष्ट्रीय सरपंच संसदे'च्या वतीने आमदार सुहासअण्णा कांदे यांचा नांदगाव येथे त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. 'एम आयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट'चे प्रणेते राहुल कराड यांच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
'राष्ट्रीय सरपंच संसदे'चे प्रमुख समन्वयक योगेश पाटील व सहसमन्वयक प्रकाशराव महाले यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व 'एमआयटी विश्वशांती घुमटा'ची प्रतिमा देऊन हा सत्कार संपन्न करण्यात आला.
'राष्ट्रीय सरपंच संसदे'चे नांदगाव तालुका अध्यक्ष व नांदगाव कृउबाचे संचालक समाधान पाटील,नांदगाव तालुका समन्वयक व नागापूरचे सरपंच राजेंद्र पवार,नांदगाव तालुका संघटक व पत्रकार राजेंद्र तळेकर,नांदगावचे माजी नगराध्यक्ष चेतन पाटील,नांदगाव तालुका भाजपा अध्यक्ष गणेश शिंदे,भालूरचे समाधान थेटे,भालूरचे उपसरपंच गणपत निकम,ग्रामपंचायत सदस्य रमेश निकम.देविदास निकम, राजेंद्र मेंगाळ,गंगाधरी चे सरपंच सचिन जेजुरकर,रामनाथ चोळके,ग्रामपंचायत बोराळेच्या लोकनियुक्त सरपंच सौ.अश्विनीताई राजेंद्र पवार,उमेश काळे,पत्रकार संजीव धामणे,बाबासाहेब कदम व सचिन बैरागी हे मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
'राष्ट्रीय सरपंच संसदे'च्या विविध उपक्रमांविषयी याप्रसंगी चर्चा झाली.
'राष्ट्रीय सरपंच संसदे'च्या वतीने नांदगाव तालुक्यात दोन दिवशीय 'नाशिक जिल्हा - सरपंच संसद' आयोजित करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करून श्री.सुहासअण्णा कांदे यांनी त्या आयोजनासाठी पूर्ण सहकार्य करण्याचा मनोदय व्यक्त केला.
नांदगाव तालुक्यातील सर्व विद्यमान सरपंचांसह सुहास अण्णा कांदे यांनी पुणे येथे ' एमआयटी' सदिच्छा भेट देण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले.
योगेश पाटील व प्रकाशराव महाले यांचे श्री.सुहासअण्णा कांदे यांनी प्रारंभी सत्कार करून स्वागत केले.
No comments:
Post a Comment