नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक उपक्रम म्हणून जायंटस ग्रुप अॉफ सहेलीच्या वतीने सामाजिक कार्य करत वस्तीवर जाऊन गरजू शालेय विद्यार्थ्यांना चप्पल जोड वाटप करण्यात आले. लहान मुले - मुली गरीब असल्याने यावेळी संस्थेने मदतीचा हात पुढे केला. प्रत्येक वेळी गरज पडली तर आम्ही मदत करू असे आश्वासन दिले. जायंटस ग्रुप सहेली यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी जायंटस ग्रुप अॉफ सहेलीच्या अध्यक्षा वैशाली दुसाने , सदस्य भारती बोरसे , पुष्पा दुसाने, वाघ मॅडम , शाळेतील शिक्षकांसह आदीची उपस्थिती होती.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment