नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव शहरातील मुख्य मार्गावर, चौका - चौकात अशा मोकाट मुकी जनावरे फिरताना व रस्त्यावर मधोमध बसत असताना वाहनचालक, महिला, वय वृद्ध व्यक्ती यांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील बहुतांश रस्त्यांवर मोकाट जनावरांनी ठिय्या मांडला आहे. परिणामी वारंवार वाहतूक विस्कळीत होण्याबरोबरच छोट्या- मोठ्या अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. नगर पालिकेकडून मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी कुठलीही मोहीम राबविली जात नसल्याचे पहावयास मिळत आहे. परंतु, रस्त्यावरच मोकाट जनावरे उभी राहत असल्याने पादचा-यांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक वारंवार विस्कळीत होत आहे. परंतु, नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे आणि त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. ज्या व्यक्तीचे ही जनावरे आहेत त्यांवर प्रशासन कारवाई कधी करणार अशा प्रश्न नागरिकांना पडला आहे. मोकाट जनावरे मुळं एखाद्या व्यक्तीचा जीव जावू शकतो. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर यांवर लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,
नांदगाव (प्रतिनिधी ) - शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...
No comments:
Post a Comment