Monday, June 30, 2025

नांदगाव शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी,







नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी नांदगाव पोलीस स्टेशनला निवेदनाद्वारे महापुरुषांच्या पुतळ्यांना संरक्षण देण्याबाबत ची मागणी केली आहे. मतदार संघातील नांदगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज , राष्ट्रपिता महात्मा गांधी,  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,  महात्मा ज्योतिराव फुले,  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदी महापुरुषांच्या पुतळ्यांना संरक्षण नसल्यामुळे पुतळ्यांची विटंबना होऊन समाजात जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्यामुळे सदर पुतळ्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी निवेदनाद्वारे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केले आहे.
     सोमवारी दि.  ३० जून रोजी पहाटे एका मनोरुग्ण महिला द्वारे अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या सुशोभीकरणाचे लाईट तोडण्यात आले असून,  यामुळे स्मारकाचे विटंबन व नुकसान झालेले आहे . यामुळे सामाजिक भावना दुखावल्या असून धनगर समाजात तीव्र नाराजी निर्माण झालेली आहे. सदर घटनेत महिला वेडसर असल्याने समाजाने सामंजसाची भूमिका  घेतली असली तरी यापुढे असे गैरकृत्य होऊ नये याची काळजी म्हणून यास संरक्षण मिळावे म्हणून आमदार सुहास कांदे यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष साईनाथ बिडगे,  माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, चंद्रशेखर कवडे, युवासेनेचे तालुकाध्यक्ष सागर हिरे, त्र्यंबक शेरमाळे, राजेश शिंदे, बिरू शिंदे, शरद आयनोर ,सुनील नेमणार, शुभम शिंदे, दीपक बनगर,  निवृत्ती शिंदे , डॉ.गणेश चव्हाण,  विकी सोर,  भिका खटके , चांगु खेमनार,  जय तांबे,  संतोष सोर , महिंद्र गायकवाड, तानसेन जगताप उपस्थित होते.




No comments:

Post a Comment

नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...