नांदगाव (प्रतिनिधी ) - महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण ठरविण्यासाठी गठित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय समितीवरील सदस्यांची नियुक्ती राज्य सरकारकडून नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. समितीत विशेष निमंत्रित म्हणून १३ सदस्यांची निवड करण्यात आली असून , यामध्ये नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. यासंबंधीचे परिपत्रक नुकतेच काढण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण ठरविण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मे २०२५ मध्ये समिती स्थापना केली होती. या समितीत १३ विशेष निमंत्रित सदस्यांची निवड करण्यात आली आहे. नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांच्या सह प्रवीण दटके, देवेंद्र कोठे, डॉ. बाबासाहेब देशमुख, वरुण सरदेसाई, रोहित पाटील या तरुण आमदारांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment