नांदगाव ( प्रतिनिधी ) नांदगाव येथे क्रीडा व युवक संचालनाय महाराष्ट्र राज्य पुणे तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय , नांदगाव आणि रायझिंग यंगस्टर क्रिकेट ॲकॅडमी , नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुकास्तरीय शालेय सिझन बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर करण्यात आलं होतं. नांदगाव तालुका क्रीडा अधिकारी संजय त्रिभुवन सर , संदीप आहेर सर हे उपस्थित होते. या स्पर्धेचे उद्घाटन श्रीराम कला क्रीडा मंडळ कबड्डी क्लबचे प्रशिक्षक विशाल आव्हाड सर , रायझिंग यंगस्टार क्रिकेट ॲकॅडमी संस्थापक कोच संतोष चव्हाण सर , न्यू इंग्लिश स्कूलचे क्रीडा शिक्षक प्रशांत पाटील सर, मनमाड साईराज इंटरनॅशनल स्कूल चे क्रीडा शिक्षक सौरभ जैन उपस्थित होते. या स्पर्धेला यांनी दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेमध्ये १४ वयोगटातील सांघिक खेळाच्या जोरावर मुलांमध्ये इंग्लिश स्कूल मुलांचा संघ विजयी झाला . तर मनमाड साईराज इंटरनॅशनल स्कूल उपविजेता झाला. या स्पर्धेमध्ये साईराज इंटरनॅशनल स्कूल यांनी पहिले नाणेफेक जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला व इंग्लिश स्कूल नांदगाव यांनी प्रथम फलंदाजी केली व दहा ओव्हर मध्ये ११८ रन पूर्ण केले . अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत साईराज इंटरनॅशनल स्कूल हे फक्त अवघे ४८ रन सर्व बाद झाले झाले . न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव हा संघ स्कूल ७० धावांनी विजयी झाले.
Subscribe to:
Comments (Atom)
नांदगाव येथील विद्यालयात 'अत्याधुनिक संगणक लॅब' तून विद्यार्थ्यांना संगणकीय धडे मिळणार,
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील नाशिक शिक्षण प्रसारीत मंडळ संचलित स्व. मिश्रीलाल भिकचंद छाजेड विद्यालयात नूतनीकरण करण्यात ...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...