नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५ साठी २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया होत आहे. निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना शिवसेना (शिंदे गट) व भारतीय जनता पक्ष हे युतीत नांदगाव नगरपरिषदेची निवडणूक लढविणार आहेत, अशी माहिती आमदार सुहास कांदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नांदगाव येथील आमदार सुहास कांदे यांच्या निवासस्थान असलेल्या देवास बंगल्यावर शिवसेना तसेच भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषद घेऊन शिवसेना शिंदे गट, तसेच भारतीय जनता पक्ष हे दोघेही युतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढविणार असल्याची माहिती आमदार सुहास कांदे यांनी दिली. या बैठकीला अंजुम कांदे यांच्यासह शिवसेना तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार कांदे यांनी शिवसेना-भाजपच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नगरपरिषदेवर युतीचा भगवा फडकवणार असल्याचे सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष संजय सानप यांनी युती झाल्याचे जाहीर केले. भाजप व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजेड यांनी आमदार कांदे यांनी केलेल्या विकासाचा झंझावात पाहता, युती केल्याचे स्पष्ट केले. याप्रसंगी नांदगाव नगरीचे माजी नगरअध्यक्ष राजेश कवडे, उमेश उगले, शिवसेना तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, शहर प्रमुख सुनिल जाधव , शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment