नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक - २०२५ निवडणूकीच्या अर्जांची छाननी प्रक्रिया मंगळवारी पुर्ण झाली असून, एक नगराध्यक्ष पदासाठी सात उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे तर नगराध्यक्ष पदाचे राजेश कवडे यांचा शिवसेना पक्षाचा अर्ज अवैध ठरला आहे. एकुण २०
सदस्यपदासाठी ८० अर्ज दाखल झाले होते . त्यापैकी
१४ अवैध ठरले असून, ६६ अर्ज वैध ठरले आहे. तर मतदानाअगोरदच आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाने प्रभाग क्रमांक ८ ब एक जागा बिनविरोध करत खाते उघडले आहे.
आमदार सुहास कांदे यांचे कट्टर समर्थक असलेल्या सागर हिरे यांना शिवसेना शिंदे गट व भाजप युतीच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी निश्चित झाली असून, छाननी प्रक्रियेत शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज दाखल केलेले राजेश कवडे यांना मोठा धक्का बसला असून त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. तर सागर हिरे यांचा अर्ज वैध ठरवला. सागर हिरे यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर सुहास कांदे समर्थक कार्यकर्त्यांनी यावेळी एकच जल्लोष केला.
प्रभाग क्रमांक ८ 'ब' मधून शिंदे गटाच्या उमेदवार खान जुबेदाबी गफ्फार बिनविरोध,
- दरम्यान नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पहिला 'बिनविरोध' विजय मिळवत खाते उघडले आहे. प्रभाग क्रमांक ८ 'ब' मधून शिंदे गटाच्या उमेदवार खान जुबेदाबी गफ्फार यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.नांदगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा विजयी होणारा हा पहिला उमेदवार ठरला आहे. खान जुबेदाबी गफ्फार या शिंदे गटाच्या पहिल्या नगरसेविका ठरल्या आहेत. उमेदवार खान जुबेदाबी गफ्फार यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे नांदगावमध्ये शिवसेना शिंदे गटाचे मनोबल वाढले आहे. एकीकडे नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत अपेक्षित असताना, सदस्याच्या जागेवर बिनविरोध विजय मिळवल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाने विजयी सुरुवात केली आहे. नगपरिषद सदस्याच्या एका जागेवर शिंदे गटाने बिनविरोध विजय मिळवला असला तरी, नगराध्यक्षपदासाठी येथे मोठी चुरस पाहायला मिळत आहे. नगराध्यक्षपदासाठी मुख्यतः तिरंगी किंवा चौरंगी लढत अपेक्षित आहे.
No comments:
Post a Comment