नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथील श्री राम कला क्रीडा मंडळ व स्वर्गीय मातोश्री गायत्री आव्हाड फिटनेस क्लबची खेळाडू शालिनी गवळे हिची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी नाशिक ग्रामीण संघात निवड झालेली आहे. तिला तिच्या मार्गदर्शक शिक्षक विशाल आव्हाड सर (प्रशिक्षक) यांचे योग्य मार्गदर्शन लाभले. तिने प्रचंड मेहनत घेत मोठं यश संपादन केले. शालिनी व तिचे प्रशिक्षक दोघांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे. सामना खेळताना असताना तिच्या डोक्याला दुखापत झाली होती. डॉक्टरने तिला दोन - चार दिवस आराम सांगितला. पण तिने हार मानली नाही. आपला खेळ सुरुच ठेवला. तिची जिद्द व चिकाटीने तिने थेट राज्यस्तरीय नाशिक ग्रामीण कबड्डी संघात निवड झाली. तिच्या जिद्दीला सलाम सर्व नागरिकांनी दिला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment