नांदगाव (प्रतिनिधी ) - नायलॉन मांजा पर्यावरणास धोकादायक असून नायलॉन मांजावर बंदी आहे. त्याची विक्री आणि वापर करू नये, नायलॉन मांजा पर्यावरणासाठी आणि सजीवांसाठी धोकादायक आहे, मांजाचा वापर टाळावा, असे आवाहन नांदगाव नगरपरिषद मुख्याधिकारी शामकांत जाधव यांनी केले आहे. मांजा बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी नांदगाव शहरात पथक स्थापन करून जनजागृतीसह कारवाई केली जाणार आहेत. कोणीही प्रतिबंधित मांजाची विक्री, उत्पादन, साठा, पुरवठा व वापर करणार नाही, याची दक्षता ही पथके घेणार आहे. तसेच, नागरिकांच्या तक्रारी स्विकारणार आहे . मांजाबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे मुख्याधिकारी जाधव यांनी सांगितले आहे. सध्या पतंग उडविण्यासाठी मांजा वापरला जातो, पण नॉयलन मांजा मुळे गंभीर स्वरूप च््यया शारीरिक इजा झाल्या आहेत. आता नगरपरिषद प्रशासन यांवर लक्ष केंद्रित असून वापरास बंदी असलेल्या मांजा जप्त करून संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment