नांदगाव (प्रतिनिधी ) - सटाणा तालुक्यातील खतमाणे येथील नाभिक समाजाच्या अल्पवयीन मुलीवर गावगुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने अमानुषपणे अत्याचार केल्याच्या निषेधार्थ येथील नाभिक समाज बांधवांनी पोलीस निरीक्षक दिंगबर भदाणे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सटाणा तालुक्यातील खतमाणे येथील नाभिक समाजाच्या अल्पवयीन मुलीवर गावगुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती कडून अमानुषपणे अत्याचार करण्यात आला आहे. नाभिक समाजातील मुलीवर अत्याचार करुन सदरचे प्रकरण दडपण्यासाठी व समाजातील गुंड प्रवृतीच्या व्यक्तीला वाचविण्यासाठी गावातील पुढारी व इतर प्रयत्न करीत आहेत. सध्या सगळीकडे अज्ञान मुर्तीवर अत्याचार होत आहेत. नाभिक समाजातील एकमेव घर असलेल्या कुटुंबियांवर गावगुंडाकडून दमदाटी, धमकी, तसेच जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी देण्यात येत आहे. या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीवर कठोर कारवाई कारवाई करावी ,यासाठी पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी व शासनाने या नराधमास कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी विजय निकम, रविंद्र बिडवे , दिपक झुजाराव, सतिष बिडवे, ज्येष्ठ सुरेश निकम , नरेंद्र निकम, सुनिल निमराने, दिपक निकम, राजु निकम, युवासेना तालुकाप्रमुख सागर हिरे, शिवसेना शहराध्यक्ष सुनिल जाधव, कृउबा संचालक अमोल नावंदर,नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment