Monday, December 29, 2025

नांदगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार सागर हिरे यांनी स्वीकारला,






नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना पक्षाने एकहाती सत्ता स्थापन केली होती.  नांदगाव नगरपरिषदेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे यांनी सोमवारी आमदार सुहास कांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी चौकातील शिवस्फूर्ती प्रांगणात भव्य व उत्साहपूर्ण सोहळ्यात नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांसह नांदगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगराध्यक्षपदाची शपथ घेत सागर हिरे यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला.
  नांदगाव शहरातील मायबाप जनतेने आमच्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याला कधीही तडा जाऊ देणार नाही, असे आश्वासनही आमदार सुहास कांदे यांनी यावेळी दिले. लवकरच गिरणाधरणातून नांदगाव शहरातील नागरिकांना चोवीस तास पाणीपुरवठा उपलब्ध करून दिला जाईल. तसेच छत्रपती शिवाजी चौकातील शिवस्फूर्ती प्रांगणात सिंहासनावर आरूढ छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असून महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे पुतळेही लवकरच वसविण्यात येतील असं आश्वासन दिले. 
 कार्यक्रमात समृद्धी बँकेचे चेअरमन अंजुम कांदे, वाल्मिक जगताप, दत्तराज छाजेड, साईनाथ गिडगे, राजेंद्र पवार, विलास आहेर, रोहिणी मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या सोहळ्यास माजी आमदार अॅड. अनिल आहेर, बापूसाहेब
कवडे, राजेंद्र पवार, अरुण पाटील, तेज कवडे, रमेश बोरसे, दर्शन आहेर, अर्जुन पाटील, समाधान पाटील, सतीश बोरसे, चेतन पाटील, बाळासाहेब कवडे, रमेश करवा, श्याम दुसाने, गोकुळ कोठारी, नूतन कासलीवाल, सर्व नवनिर्वाचित नगरसेवक तसेच शिवाजी पाटील, नंदू पाटील, दत्तराज छाजेड आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविक शिवसेना शहराध्यक्ष सुनील जाधव यांनी केले, तर सूत्रसंचालन बाजार समितीचे संचालक अमोल नावंदर यांनी केले.


No comments:

Post a Comment

न्यू इंग्लिश विद्यालयात 'जागतिक महिला दिन' उत्साहात साजरा,

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल  मध्ये 'जागतिक महिला दिन' मोठ्या उत्साहात...