नांदगाव ग्रामीण (प्रतिनिधी) - नांदगाव - मांडवड मविप्र संस्थे अंतर्गत कर्मवीर चषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन नाशिक येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये स्व.शरद आण्णा आहेर जनता विद्यालय, मांडवडच्या खेळाडूंनी अव्वल क्रमांक पटकावत पहिल्याच चषकावर आपले नाव कोरले. या संघात वैजयंती गांगुर्डे (संघनायक) ऋतुजा आहेर,श्वेता गांगुर्डे, पूनम गांगुर्डे,अक्षदा गांगुर्डे, सायली आहेर, निकिता मोकाशे, राणी गुजर, नंदिनी पिंगळे, ऋतिका आहेर, वैष्णवी आहेर या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकाविला तसेच कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगाव मुलांच्या संघाने चौथ्या क्रमांकाचा बहुमान मिळवला. या निमित्ताने मांडवड गावातील ग्रामस्थांच्या वतीने दोन्ही संघांचा भव्य नागरी सत्कार समारंभ मांडवड विद्यालयात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र संचालक इंजि. अमित बोरसे पाटील होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून नांदगाव तालुक्याचे पोलीस निरीक्षक भदाणे साहेब ,छत्रपती पुरस्कार विजेते विष्णू निकम छत्रे हायस्कूल मनमाड चे माजी मुख्याध्यापक प्रवीण व्यवहारे,शाळेचे स्कूल कमिटी अध्यक्ष प्रशांत आहेर,मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठ्ठल आहेर, मार्गदर्शक रमेश अण्णा बोरसे, माजी सरपंच चंद्रसेन आबा आहेर , नांदगाव नगरपरिषदेचे पाणी पुरवठा अभियंता सुयोग पाटील, स्वच्छता निरीक्षक तुषार लोणारी, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगाव चे प्राचार्य डॉ. आर. एन. भवरे,जातेगाव विद्यालयाचे प्राचार्य धुळे शनी मंदिर विश्वस्त उदय पाटील,सुरेश शेळके, किरणं काळे, न्यू इंग्लिश स्कूल उपमुख्यध्यापक चव्हाण हे उपस्थित होते. विजेत्या संघातील खेळाडूंनी मविप्र संस्थेकडून ट्रॉफी व ३१ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले यामध्ये मविप्र नांदगाव संचालक अमित बोरसे पाटील यांनी वैयक्तिक २१ हजार रुपये तसेच अशोक निकम यांनी अकरा हजार,सुबोध थेटे पांच हजार, गंगाधर थेटे, पिंगळे डॉ.प्रवीण निकम, अण्णासाहेब गडाख आदींनी विजयी संघाला बक्षीस देऊन सन्मान केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक थेटे एस जी यांनी केले. खेळाडूंनी सातत्य ठेवले तर निश्चित चार-पाच वर्षांमध्ये मांडवड शाळेचे विद्यार्थी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये चमकतील अशी अपेक्षा प्रवीण व्यवहारे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. कुठल्याही खेळातून आपण चांगलं प्राविण्य मिळवलं तर आपणास महाराष्ट्र शासनाच्या वतीने खेळाडू कोठ्यामधून चांगल्या ठिकाणी नोकरीची संधी मिळून आपले करिअर आपण घडू शकतो अशी अपेक्षा यावेळी विष्णू निकम यांनी केली .
यावेळेस नांदगाव पोलीस निरीक्षक भदाणे साहेब यांनी विद्यार्थ्यांना खेळाकडे करिअर म्हणून बघावे व पालकांनीही विद्यार्थ्यांना खेळामध्ये प्रोत्साहन द्यावे असे संबोधित केले. संस्थेचे संचालक बोरसे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या चषकामुळे एक मविप्र नांदगाव संचालक म्हणून मला सार्थ अभिमान आहे.यापुढे विद्यार्थ्यांच्या खेळण्यासाठी लागणाऱ्या क्रीडा साहित्य व इतर सुख सुविधा संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुरवण्यात येतील, विद्यार्थ्यांच्या क्रीडा कला या अंगभूत क्षमतांना वाव देण्यासाठी संस्थेमार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपली पात्रता सिद्ध करावी. व गावाचे तालुक्याचे नाव मोठे करावे असे आव्हान केले. यावेळेस व्यासपीठावर संस्थेचे सभासद रामराव मोहिते, मुख्याध्यापक थेटे एस. जी. पर्यवेक्षक महाले आर. एस. शालेय स्कूल कमिटी सदस्य अण्णासाहेब गडाख, यांच्यासह खेळाडूंचे पालक नातेवाईक ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक संदीप आहेर यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यालयाचे उपशिक्षक हेमंत परदेशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment