नांदगाव (प्रतिनिधी) - विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये रुजवण्यासाठी आणि परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने 'कॉपीमुक्त परीक्षा' अभियान राबवले जात आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून नांदगाव येथील मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात सर्व विद्यार्थ्यांना 'कॉपीमुक्ती'ची सामूहिक शपथ देण्यात आली.
परिपाठाच्या वेळी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाचे उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना कॉपीचे दुष्परिणाम आणि प्रामाणिक अभ्यासाचे महत्त्व समजावून सांगितले.
क्रीडा शिक्षक प्रशांत पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना , "मी परीक्षेत कोणत्याही प्रकारचा गैरमार्ग अवलंबणार नाही, मी कोणाचीही मदत घेणार नाही किंवा कोणाला मदत करणार नाही. मी माझ्या कष्टावर आणि कतृत्वावर विश्वास ठेवून पूर्ण प्रामाणिकपणे परीक्षा देईन," अशी सामूहिक शपथ दिली.
विद्यार्थी उत्स्फूर्त प्रतिसाद केवळ परीक्षेत उत्तीर्ण होणे महत्त्वाचे नसून, मिळवलेले ज्ञान शुद्ध असावे, या उद्देशाने घेतलेल्या या शपथमुळे विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला.
यावेळी बोलताना मुख्याध्यापिका ज्योती काळे म्हणाल्या की, "कॉपीमुळे विद्यार्थ्यांचे बौद्धिक नुकसान होते आणि आत्मविश्वास डगमगतो. हे अभियान केवळ परीक्षेपुरते मर्यादित न राहता ती एक जीवनशैली बनावी, हा आमचा प्रयत्न आहे."
हा अभियान दि. १९ जानेवारी ते २६ जानेवारी 'कॉपीमुक्त परीक्षा अभियान सप्ताह' राबविण्यात येणार आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा अनावश्यक ताण कमी होण्यास , परीक्षेची भिती नष्ट करण्यास मदत होईल व विद्यार्थी आत्मविश्वासाने परीक्षेस सामोरे जातील अशी आशा व्यक्त केली जात आहे. याप्रसंगी पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment