नांदगाव (प्रतिनिधी) - मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतीकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती 'पराक्रम दिन' म्हणून अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नेताजींच्या महान कार्याला आणि बलिदानाला अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे मुख्याध्यापिका ज्योती काळे,उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण,पर्यवेक्षक अविनाश शेवाळे यांच्या हस्ते नेताजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
इ . ५ वी च्या आराध्या शिंदे या विद्यार्थ्यांनी नेताजींच्या जीवनावर भाषण व लावण्या देशमुख हिने 'वह लहू कहो किस मतलब का जिसमें आता उबाल नहीं ' हि कविता सादर केली.
पर्यवेक्षक अविनाश शेवाळे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की, " भारत माता ही केवळ एक भूमी नसून ती एक शक्ति आहे, हे नेताजींनी आपल्या कृतीतून जगाला दाखवून दिले."
याप्रसंगी बोलताना मुख्याध्यापिका ज्योती काळे सांगितले की, "आजच्या तरुण पिढीला नेताजींचे शिस्तप्रिय जीवन आणि राष्ट्रप्रेम प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता राष्ट्रहित जोपासण्यासाठी सदैव तत्पर राहिले पाहिजे." या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी कवडे यांनी केले.
No comments:
Post a Comment