Sunday, February 8, 2026

नांदगाव येथे महिला बालकल्याण विभाग यांच्यावतीने माता रमाबाई भिमराव आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी!!






नांदगाव ( प्रतिनिधी) -   नांदगाव नगरपरिषद अंतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान स्त्री शक्ती शहर स्तर संघ संचलित सोनचिरैया शहर उपजीविका केंद्र व महिला बालकल्याण विभाग यांच्या वतीने माता रमाबाई भिमराव आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी नांदगाव नगर परिषदेच्या गटनेत्या स्वाती नावंदर, महिला बालकल्याण सभापती एडवोकेट विद्या कसबे, नगरसेविका कल्पना जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  याप्रसंगी सी. एल. सी
 व्यवस्थापक गंगावणे मॅडम यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला नगर सेविका राखी  जाधव, महिला आघाडीच्या नेहा कोळगे, जया जगताप, अंगणवाडी शिक्षिका माया पगारे आदी उपस्थित होत्या . माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने सीएलएफच्या अध्यक्ष राजश्री बेलदार , सचिव शबाना मन्सुरी, खजिनदार सुनीता देहाडे , ताईमीना शेख,  जयश्री निकम, कल्पना भोसले, सुमित्रा शिंदे तसेच CRP उषाताई शिंदे, ज्योतीताई परदेशी, मनीषा काकळीज , सुमित्रा ताई शिंदे आदींनी मेहनत घेतली. कार्यक्रमाला बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या , नांदगाव नगरपालिके मार्फत माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात करण्यात आली. याप्रसंगी रमाईच्या वेशभूषेमध्ये रेवा गणेश बेलदार हिने सगळ्यांचे लक्ष वेधले.

No comments:

Post a Comment

नांदगाव येथील मविप्रच्या महाविद्यालयात बारावीच्या परीक्षेची आसनव्यवस्था जाहीर, उद्यापासून परिक्षेला सुरुवात होणार!

नांदगाव (प्रतिनिधी ) -  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या २०२६ च्या बारावी (HSC) परीक्षा १०...