Friday, June 21, 2024

नांदगाव येथील होरायझन ॲकॅडमीच्या प्रांगणावर विद्यार्थ्यांनी ग्रीन- डे उत्साहात केला साजरा ,





नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यातील नाशिक मराठा विद्या प्रसारक समाज संचलित होरायझन ॲकॅडमी नांदगाव येथील विद्यार्थ्यांनी ग्रीन- डे उत्साहात साजरा केला. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
       विद्यार्थ्यांनी हिरव्या रंगाचे पोशाख परिधान करून झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरण वाचवा देश वाचवा असे विविध संदेश देणारे पोशाख परिधान करून सामाजिक संदेश दिला. झाडांची पाने, झाडांच्या आकाराची कलाकृती, झाडांची रोपटे आदी सर्व विद्यार्थ्यांनी शाळेत आणले होते पर्यावरण संतुलित राहावे यासाठी वृक्षारोपण गरजेचे आहे असाही संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला. विद्यार्थ्यांनी हरित भारत, पृथ्वीमाता असे अनेक पोस्टर बनवले होते, आपल्या मनपसंतीच्या गीतांवर नृत्य सादर केले. तसेच हिरव्या पालेभाज्या आणि हिरवी खाद्यपदार्थ आदी व्यंजनांचा आस्वाद घेतला. व वृक्ष,पक्षी, पृथ्वी यांच्या प्रतिकृती तयार केल्या होत्या. 
        मविप्र समाज संस्थेचे नांदगाव तालुका संचालक इंजि.अमित भाऊ बोरसे-पाटील यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या व चिमुकल्यांचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्या श्रीमती.पी.डी.मढे, अकॅडमीचे शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.





Thursday, June 13, 2024

नांदगाव येथील होरायझन अकॅडमीत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत, शाळेत विद्यार्थ्यांना सीबीएससी माध्यमातून शिक्षण मिळणार!!






नांदगाव (प्रतिनिधी) - नाशिक मराठा विद्या प्रसारक समाजाचे, होरायझन अकॅडमी, नांदगावचा   पहिला दिवस या निमित्त विद्यार्थ्यांचे होरायझन अकॅडमीच्या वतीने स्वागत करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थी शाळेच्या गेटमध्ये आल्यानंतर प्राचार्या श्रीमती पुनम डी मढे यांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन तसेच मुलांचे औक्षण करून स्वागत केले. शाळेचा पहिला दिवस असल्याकारणाने विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते. यावेळी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन न्यू इंग्लिश स्कूल, नांदगाव शाळेचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व्ही.वाय.काकळीज यांनी प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. तसेच कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्राचार्या श्रीमती पुनम डी. मढे. यांनी केले. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. तसेच शाळेच्या प्राचार्या श्रीमती पुनम डी. मढे . यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. होरायझन अकॅडमी विषयी संपूर्ण माहिती त्या प्रास्ताविक भाषणामध्ये सांगितली. पहिलाच दिवस असल्याकारणाने विद्यार्थ्यांना गाणे गोष्टी तसेच शालेय अभ्यासक्रमाविषयी शाळेच्या प्राचार्या यांनी माहिती सांगितली. या कार्यक्रमासाठी मविप्र समाज संस्थेचे नांदगाव तालुका संचालक इंजि. अमित  बोरसे-पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा खांडेकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

Tuesday, June 11, 2024

नांदगावच्या कामगार वसाहतीत पत्रकार महेश पेवाल यांच्या घरावर पिंपळाचे झाड कोसळून मोठे नुकसान,



नांदगाव( प्रतिनिधी) - नांदगाव  शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील कामगार वसाहती पत्रकार महेश पेवाल यांच्या घरावर पिंपळाचे झाड कोसळून घराचे मोठे नुकसान झाले . यात अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. नांदगाव शहर व परिसरात रविवार पासुन हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो आहे.  दुपारीच्या सुमारास पावसाला सुरुवात होताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील कामगार वसाहतीतील पत्रकार महेश पेवाल यांच्या घराला लागून असलेले पिंपळाचे झाड कोसळुन घराचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी पेवाल यांच्या घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच नगर पालिकेचे अधिकारी राहूल कुटे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व पाहणी करून पालिकेच्या आपत्कालीन विभागाला सूचना करून ते झाड तात्काळ काढून घेण्यासाठी सूचना केल्या . याशिवाय तहसीलदार सुनील सौदाणे यांनीही तात्काळ दखल घेऊन तलाठी शिरसाठ यांना पंचनामा करण्यासाठी पाठवले. तलाठी शिरसाठ यांनी पंचनामा केला असून अंदाजे अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये घरातील संसारपयोगी वस्तू, कपाट, फ्रिज, टि.व्ही. घरघंटी, भांडे, घराचे पत्रे, घराची भिंत कोसळल्याने अन्नधान्य यांचे नुकसान झाले आहे. झाड कोसळत असताना पेवाल यांचे मोठे बंधू, वहिनी, आई घरात विश्रांती घेत होते. घराची भिंत कोसळत असल्याचे पाहताच त्यांनी वृध्द आईला घेऊन घराबाहेर पळाले . यामुळे सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.




नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...