Wednesday, August 20, 2025

'बहुजन हिताय ,बहुजन सुखाय' या संस्थेच्या ब्रीदवाक्यानुसार आपण सर्वांनी जात पात बाजूला ठेवून संस्थेचा प्रगतीचा विचार करावा - इंजि.अमित पाटील.






   नांदगाव  (प्रतिनिधी) -  मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जयंती निमित्ताने संस्थेत १९ ऑगस्ट समाजदिन म्हणून साजरा करण्यात येतो. विद्यालयाच्या प्रांगणात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल , औद्योगिक प्रशिक्षण केंद्र,आदर्श प्राथमिक शाळा , होरायझन अकॅडमी, बाह्य रुग्ण सेवा कक्ष, नांदगाव या सर्व संकुलांच्या संयुक्त विद्यमानाने संस्थेचा समाजदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे तालुका संचालक इंजि.अमित बोरसे-पाटील होते. मंचावर राजाभाऊ देशमुख (माजी आमदार ), डॉ.दिलीप शिंदे (प्रमुख वक्ते),  माननीय शरद पाटील (अध्यक्ष, महाविद्यालय व्यवस्थापन समिती),राजाराम गवांदे (अध्यक्ष, आदर्श,शालेय व्यवस्थापन समिती), सुनील बोरसे (अध्यक्ष आयटीआय  व्यवस्थापन समिती) विजय काकळीज( अध्यक्ष, न्यू इंग्लिश स्कूल,शालेय व्यवस्थापन समिती),  विश्वासराव कवडे (ज्येष्ठ सभासद), दत्तात्रय काकळीज (ज्येष्ठ सभासद ),आनंदा गुंड माळी श्रीमती विद्या पवार हेमंत पवार रमेश अण्णा बोरसे राजेश पाटील, नूतनशेठ कासलीवाल,पुंजाराम जाधव,उदय पाटील, मान्यवर उपस्थित होते.
      संस्थेच्या समाज ध्वजाचे ध्वजारोहण तालुका संचालक इंजि. अमित बोरसे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. संस्थेचे समाजगीत विद्यालयाच्या गीतमंचाने सादर केले. 
   यानंतर समाजदिन निमित्ताने रेखाटलेल्या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन प्रा.दिलीप शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. होरायझन अकॅडमीचे कलाशिक्षक सौरभ शेवरे यांनी कर्मवीर रावसाहेब थोरात व संस्थेचे बोधचिन्ह तर न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी ओम सुपेकर याने कर्मवीर डी. आर. भोसले व आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी प्रतिकृती सुंदर रेखाटली.
       मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम सरस्वती मातेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर रावसाहेब थोरात, कर्मवीर भाऊसाहेब हिरे, कर्मवीर काकासाहेब वाघ, कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे, कर्मवीर डी आर भोसले, कर्मवीर गणपत दादा मोरे, कर्मवीर बाबुराव ठाकरे, कर्मवीर विठ्ठलराव हांडे, कर्मवीर वसंतराव पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
       कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून दीपक चव्हाण यांनी समाजदिनाचा मुख्य उद्देश सांगितला. कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष इंजि.अमित बोरसे-पाटील यांचा सन्मान विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी केला तसेच मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
  विजय काकळीज यांनी आपल्या मनोगतातून समाजदिनाची सुरुवात केव्हापासून झाली हे सांगितले. श्रीमती विद्याताई पाटील यांनी आपल्या मनोगतातून संस्थेविषयी आदर व्यक्त केला.
     विद्यालयातील गीतमंचाने कर्मवीरांच्या जीवन कार्यावर आधारित सुंदर पोवाडा सादर केला. त्यांना मार्गदर्शक व संगीत साथ  विद्यालयाच्या संगीत शिक्षिका कल्पना आहिरे यांनी दिली.
      कार्यक्रमास गोटू गोपीनाथ निकम, जयवंत चव्हाण, अशोक जाधव , बाबूलाल सावंत,सुदामराव काळे, पोपटराव पवार,  शामराव काकळीज ,दौलतराव आहेर, वामनराव घोटेकर,  रामनाथ गायकवाड,  दत्तात्रय काकळीज, सुनील पगार ,रामराव मोहिते प्रभाकर कवडे,रवींद्र कवडे ,कुणाल देशमुख,   किशोर शिंदे, जनार्दन पवार, नितीन आहेर,अनिल आहेर,दिलीप आहेर, रवींद्र आहेर,  मिनीनाथ चोळके , अरविंद पाटील,रविकांत पाटील,कौतिक शिंदे तुकाराम चव्हाण, डॉ.गणेश चव्हाण इत्यादी मान्यवर सभासद उपस्थित होते.
       आपल्या अध्यक्षीय मनोगतातून असून इंजि.अमित पाटील यांनी 'बहुजन हिताय ,बहुजन सुखाय' या संस्थेच्या ब्रीदवाक्यानुसार आपण सर्वांनी जात पात बाजूला ठेवून संस्थेचा प्रगतीचा विचार करावा. विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळावे ,संस्थेचे विकास हेच माझे प्रामाणिक ध्येय असेल हे सांगितले. त्यांनी सर्व उपस्थित त्यांना समाजदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
    प्रमुख वक्ते प्रा.दिलीप शिंदे यांनी आपल्या मनोगतातून सर्व कर्मवीरांनी संस्थेसाठी केलेल्या कार्याची परिचय करून दिली. तसेच चंदनासारखे कर्मवीरांचे कार्य सतत दरवळत राहील. सर्वांनी विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास कसा होईल यासाठी प्रयत्नशील राहावे हे सांगितले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व संकुलातील शिक्षक , शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भिला पवार , दत्तात्रय भिलोरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.संजय मराठे यांनी केले.कार्यक्रमाची सांगता संगीत शिक्षिका कल्पना अहिरे यांनी पसायदानाने केली.

Tuesday, August 19, 2025

अतिवृष्टीमुळे मोठ्या संख्येने शेती पिकांचे नुकसान, सरसकट पंचनामे करण्याचे आमदार सुहास कांदे यांच्या सूचना,





नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव विधानसभा मतदारसंघातील कळवाडी तसेच परिसरातील गावांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाची नुकसान झाले आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कळवाडी तसेच परिसरातील अनेक शेतकरी बांधवांच्या शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडला आहे. 
    सदर परिस्थितीची माहिती मिळताच आमदार सुहास अण्णा कांदे यांनी तात्काळ तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पाहणी करून तातडीने सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना केल्या नंतर  तहसीलदार तुषार सोनवणे, तसेच कृषी अधिकारी भगवान गोरुडे आणि संबंधित अधिकारी यांनी कळवाडी सह नरडाने, चिंचगव्हाण, साकूर येथील झालेल्या नुसानची पाहणी केली. 
    यावेळी सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदारांना अधिकारी वर्गास दिल्या. या वेळी आमदार प्रतिनिधी म्हणून ज्ञानेश्वर कांदे या पाहणी दौऱ्यात उपस्थित होते. या प्रसंगी शेतकरी बांधव तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

_________________
कळवाडी व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांचे पिकांचे नुकसान झाले आहे, तहसीलदार व सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत - आमदार सुहास आण्णा कांदे.


Wednesday, August 13, 2025

नांदगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात मराठी साहित्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्व प्र. के. अत्रे यांची जयंती साजरी,





 
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगावच्या मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल  विद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, लेखक व शिक्षणमहर्षी प्रल्हाद केशव अत्रे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
 याप्रसंगी मुख्याध्यापिका ज्योती काळे उपमुख्याध्यापक दीपक चव्हाण ,पर्यवेक्षक अविनाश शेवाळे ज्येष्ठ शिक्षक अशोक मार्कंड, उमेश पगार, भाऊसाहेब सोनवणे, दत्तात्रेय भिलोरे,बाळासाहेब कवडे , सचिन थेटे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
      उपशिक्षक श्री राजेंद्र कदम यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा  जीवन कार्याचा परिचय करून देताना त्यांनी तुम्हारे ३० वर्ष माळवा प्रांतावर राज्य केले. त्यांनी अनेक लोकाभिमुख कामे केली. त्यामुळे त्यांना 'पुण्यश्लोक' उपाधी मिळाली. त्यांनी अनेक मंदिरे घाट, विहिरी, धर्मशाळा, रस्ते बांधकाम केले. परिसरातील भिल्ल व गोंड समाजातील लोकांना आपल्या सैन्यात सामील केले व प्रभावी सैन्य व्यवस्था केली हे सांगितले.
      उपशिक्षक सुनील सुपेकर यांनी आचार्य प्र के अत्रे  यांच्या विषयी बोलताना ,अत्रे हे एक महान नाटककार होते. त्यांनी 'साष्टांग नमस्कार' ,'भ्रमाचा भोपळा',' लग्नाची बेडी',आणि 'तो मी नव्हेच' ही नाटके त्यांची आजही लोकप्रिय आहेत. 
    अत्रे यांनी 'केशवकुमार' या टोपण नावाने अनेक कविता लिहिल्या. 'मी कसा झालो?' आणि  'कऱ्हेचे पाणी' या त्यांच्या आत्मचरित्रातून त्यांनी आपला जीवनाचा प्रवास अत्यंत प्रांजलपणे आणि प्रभावीपणे मांडला हे सांगितले.
     उपमुख्याध्यापक दीपक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सात- बारा ( ७/१२)हा शब्द कसा प्रचलित केला तर अत्रें विषयी बोलताना त्यांनी अत्रे हे एक निर्भीड व प्रभावी पत्रकार होते ते सांगितले.
     हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता विद्यालयातील सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद आहेर यांनी केले.

Saturday, July 26, 2025

सावरगावच्या माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा,







नांदगाव ( प्रतिनिधी) -  सावरगाव येथील ना. शि. प्र. मंडळ नासिक संचलित माध्यमिक विदयालय   इयत्ता १०.वी सन २०२४-२५ उत्तीर्ण विदयार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ शशिकांत जाधव व प्रमुख अतिथी ह.भ. प. रामायणाचार्य माधुरीताई शेरेकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचा प्रारंभ इशस्तवन व सरस्वतीपुजानाने झाला. कार्यक्रमाचे प्रस्तविक मा .मुख्याध्यापक मिलिंद श्रीवास्तव यांनी केले. ग्रामीण भागातील विदयार्थ्यांना शहरी भागातील विदयार्थ्यांनपेक्षा सवलतीचा अभाव असतांना, पालकांच्या शेती व्यवसायात मदत करून अभ्यासात प्रवीण्य मिळविल्याचे विषद केले व विदयार्थ्यांना भावी वाटचालीस साठी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी माजी गुणवंत विदयार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विदयालयाच्या शिक्षिका श्रीमती हरणे यांनी आपले मनोगतातुन विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. ह भ प माधुरीताई शेरेकर यांनी शालेय शिस्त व विदयार्थ्यांसाठी असलेले शिक्षकांचे योगदान ह्या विषयी दाखले देऊन मार्गदर्शन केले. डॉ. शशिकांत जाधव यांनी व मुख्याध्यापक मिलिंद श्रीवास्तव यांनी गुणवंत विदयार्थ्यांना भावी शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक यांचा पुष्प व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत काकाळीज यांनी केले प्रभाकर सूर्यवंशी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. ऋषिकेश डोमाडे यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमा साठी विद्यार्थी पालक उपस्थित होते. या कार्यक्रमा साठी सावन कासट व दगडू केदार यांनी केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शालेय शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

नांदगाव येथे नेत्र तपासणी व मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन,





नांदगाव (प्रतिनिधी ) - राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंद ऋषीजी महाराज  यांच्या जन्म जयंती निमित्ताने ओसवाल श्वेतांबर जैन संघ, जायंट्स ग्रुप ऑफ नांदगाव, नांदगाव सहेली ग्रुप, स्थानक वासी जैन कॉन्फरन्स महिला विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  नेत्र तपासणी व मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन ओसवाल भवन येथे करण्यात आले होते. या  कार्यक्रमाचा प्रारंभ जैन साध्वी मधुर व्याख्यानी पूज्य विचक्षणाजी महाराज व प्रसन्न मूर्ती पूज्य संकल्प दर्शनाजी यांच्या आशीर्वाचनाने झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओसवाल जैन संघाचे अध्यक्ष दत्तराज छाजेड यांनी केले .तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय जायंट्स  ग्रुपचे अध्यक्ष सोमनाथ दुसाने यांनी करून दिला. येथे उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा सत्कार चातुर्मास समिती अध्यक्ष आनंद चोपडा व संघ उपाध्यक्ष कमलेश पारख यांच्या हस्ते करण्यात आला.   नेत्रशल्य चिकित्सक डॉ.प्रमोद बोराडे व त्यांच्या टीमने नेत्र तपासणी केली तर चांडक पॅथॉलॉजी  लॅबच्या टीमने मधुमेह तपासणी केली. सुमारे दोनशेहून अधिक नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी जाइंट्स ग्रुपचे पदाधिकारी नरेंद्र पारख, जगन्नाथ साळुंखे, सुमित गुप्ता, बळवंत शिंदे, वामन पोतदार, सचिन खरोटे, रिषभ सुराणा, जायंटस् सहेली ग्रुपच्या अध्यक्षा वैशाली दुसाने, भारती बोरसे, वंदना कवडे, पुष्पा दुसाने, वर्षा छाजेड, छाया परदेशी, ज्योती करवा, तारा शर्मा, अनुश्रीया जोशी, शंकूतला शिंदे आदी सदस्य पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बुरकूल यांनी केले.


Thursday, July 24, 2025

माध्यमिक व कनिष्ठ महा.सेवक सहकारी पतसंस्थेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन संपन्न,







नांदगाव (प्रतिनिधी) -  नांदगाव तालुक्यातील शिक्षकांची अर्थवाहिनी असलेल्या नांदगाव तालुका माध्यमिक व कनिष्ठ महा.सेवक सहकारी पतसंस्थेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन बुधवारी दि. २३ रोजी जुलैला संपन्न झाले. या  संस्थेच्या संचालिका सौ.पल्लवीताई आहेर, संस्थापक पी.आर.पाटील, चेअरमन प्रमोद चिंधा चव्हाण, कार्यवाह आनंद चकोर व संचालक अशोक मार्कंड, संतोष इप्पर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. लवकरच नूतन इमारत मोठ्या दिमाखात शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभी राहिल असे चेअरमन प्रमोद चिंधा चव्हाण यांनी सांगितले.यावेळी इंजि.समाधान खैरनार,राजुभाऊ रत्नपारखी,द्यानेश्वर पाटील,संतोष आहेर तसेच कर्मचारी शरद देशमुख ,  शुभम सोनेज उपस्थित होते.

आयशर ट्रक - स्कूटी यांच्यात झालेल्या अपघातात दोन सख्या भावाचा मृत्यू, एक गंभीर जखमी,








नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या चांदेश्वरी धबधब्या जवळ असलेल्या घाटात नागमोडी वळणावर इंधन वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रक व स्कुटी यांच्यात झालेल्या अपघातात दोन सख्ख्या भावाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे.  घटनेची माहिती  मिळताच स्थानिक नागरिकांनी तिघांना नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यात डॉक्टरानी तपासणी करून दोघांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
 नांदगाव तालुक्यातील पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या चांदेश्वरी धबधबा जवळ असलेल्या घाटात नागमोडी वळणावर आयशर गाडी क्रमांक (MH 41 U 8525 ) व स्कुटी क्रमांक (MH 41 BQ 1723) यांच्यात जोरदार धडक होऊन दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मृत झालेले दोघेही बंधू राहुल बाळू खोडके (वय 25) आणि रोहित बाळू खोडके हे मूळचे गर्दनी, तालुका अकोला येथील रहिवासी असून, मागील एक वर्षापासून कासारी येथे वास्तव्यास होते. या अपघातात समाधान गोरख मेगाळ हा युवक जखमी झाला असून, त्याच्यावर नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच जखमींना स्थानिक रहिवाश्यानी तातडीने नांदगाव च्या ग्रामिण रुग्णालयात नेले रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. काजल साळुंखे यांनी तपासणी करून दोन्ही भावांना मृत घोषित केले. या घटनेची नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असुन , घटनेचा पुढील तपास नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर करीत आहे.

नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...