नांदगाव (प्रतिनिधी) - मराठा विद्या प्रसारक समाज संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्था व डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्र संचलित बाह्य रुग्ण कक्ष (ओपीडी) भूमिपूजन प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेचे नांदगाव तालुका संचालक अमित बोरसे पाटील यांनी संस्था संचलित संकुलांमधील नव्याने होत असलेल्या बदलांबाबत तसेच येणाऱ्या अभ्यासक्रमांबाबत तसेच विकास कामांंबाबतचे धोरण स्पष्ट केले. तसेच संस्थासंचलित भरपूर विकास कामांसाठी स्थानिक ग्रामस्थ तसेच सभासद बांधवांची मदत होत असल्याचे देखील सांगितले. आयटीआय ही संस्था प्रात्यक्षिक कौशल्यांच्या आधारावर तांत्रिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावीत असते. त्याचप्रमाणे आय. टी. आयचे विद्यार्थी हे शासकीय सेवेत,सहकारी सेवेत,औद्योगिक क्षेत्रात, उत्कृष्ट व्यावसायिक व उद्योजक बनून अनेक बेरोजगार युवकांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देत असतो. सध्याच्या काळात तांत्रिक कौशल्य असणाऱ्या युवकांची अधिक प्रमाणात गरज असल्याने तालुक्यात जास्तीत जास्त व्होकेशनल कोर्सेस साठी जागा उपलब्ध व्हावी व जास्तीत जास्त युवकांना आपले ध्येय साध्य करता यावे . त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या या उद्देशाने नांदगाव आयटीआय येथे नवीन वास्तूचा भूमिपूजन सोहळा आयोजित करीत असल्याबाबत सांगितले. त्याचप्रमाणे नांदगाव व नाशिक हे अंतर जास्त असल्याने भरपूर गरजूंना छोट्या छोट्या आजारांचे निदान करण्यासाठी नाशिक सारख्या शहरात जावे लागते तसेच काही वेळेला तात्काळ गरज असताना देखील उपचार उपलब्ध होत नाहीत म्हणून नांदगाव तालुका व परिसरातील जास्तीत जास्त रुग्णांना चांगली सुविधा मिळावी म्हणून ओपीडी ची सुरुवात करीत आहे. प्रत्येक १५ दिवसांनी संस्थेच्या तज्ञ डॉक्टर यांच्या माध्यमातून सर्व रोग निदान शिबिरे आयोजित करण्याचे नियोजन असल्याबाबत सांगितले. संस्थेचे सरचिटणीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आजच्या युगात फक्त पुस्तकी ज्ञानाला महत्व नसून आजच्या युगात टिकायचे असेल तर प्रत्येकाजवळ विज्ञानवादी धोरण हवे आणि विज्ञानवादी होण्यासाठी किमान प्रात्यक्षिक कौशल्य असावे . त्यासाठी सर्वोत्तम माध्यम म्हणजे आयटीआय होय असे नमूद केले. त्याचप्रमाणे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेने विनाअनुदानित सेवकांच्या भरघोस पगारवाढीबद्दल विनाअनुदानित सेवकांमार्फत सरचिटणीस नितीन ठाकरे तसेच पदाधिकारी वर्गाचा विशेष सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे जातेगाव येथील मविप्र समाज सभासद बांधव तसेच ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून जमा केलेल्या दहा लाख रुपये पेक्षा जास्त रकमेचे धनादेश मवीप्र पदाधिकारी तसेच संचालकांच्या प्रमुख उपस्थितीत सरचिटणीस अॅडवोकेट नितीन ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये मविप्रचे नांदगाव संचालक हे अतिशय कुशल संचालक असून नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त विकास कामे ही नांदगाव तालुक्यात सुरू आहेत . यासाठी जो पाठपुरावा आहे तो अमित बोरसे सातत्याने करीत असतात . त्याचेच फलित नांदगाव वासियांना अनुभवायला मिळत असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी विशद केले. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे सरचिटणीस अॅडवोकेट नितीन ठाकरे , संस्थेचे सभापती बाळासाहेब रामनाथ क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास बापूराव मोरे, उपसभापती देवराम बाबुराव मोगल, माजी आमदार जगन्नाथ धात्रक, माजी आमदार अॅडवोकेट अनिलदादा आहेर, नाशिक ग्रामीण संचालक रमेश पांडुरंग पिंगळे, मालेगाव तालुका संचालक रमेशचंद्र काशिनाथ बच्छाव, सटाणा तालुका संचालक डॉ.प्रसाद प्रभाकर सोनवणे,देवळा संचालक विजय पगार,नांदगाव संचालक इंजि. अमित उमेदसिंग बोरसे पाटील, महिला संचालिका श्रीमती शालनताई सोनवणे, सेवक संचालक जगन्नाथ मधुकर निंबाळकर ,डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्र संस्थेचे अधिष्ठाता डॉ.सुधीर भामरे, कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड संचालक विठ्ठल (आबा) आहेर, व डॉ.पुंजाराम आहेर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रसादभैया सोनवणे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनिल विश्वनाथ बोरसे, न्यू इंग्लिश स्कूल स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप देवचंद पाटील, आदर्श प्राथमिक शाळा स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजाराम कारभारी गवांदे तसेच मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सभासद स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, पत्रकार बांधव तसेच नांदगाव तालुक्यातील सर्व संकुलांचे प्राचार्य मुख्याध्यापक तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. एम. बिलोरे यांनी तर आभार प्रदर्शन प्राचार्य बी. बी. अत्रे यांनी केले. कार्यक्रमासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था न्यू इंग्लिश स्कूल तसेच आदर्श प्राथमिक शाळा या तिन्ही संकुलांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाची सांगता पसायदान ने करण्यात आली.
Tuesday, February 27, 2024
Monday, February 26, 2024
नांदगाव येथील गुप्ता मेडिकेयर मल्टीस्पेशल्टी हॉस्पिटलचे उद्घाटन,
नांदगाव ( प्रतिनिधी ) - एकमेकांच्या सुखदुःखात कुटुंबंांची एकी कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे नांदगाव शहरातील गुप्ता कुटुंबं आहे, असे गौरवोदगार आमदार सुहास कांदे यांनी काढले. नांदगाव येथील गुप्ता मेडिकेयर मल्टीस्पेशल्टी हॉस्पिटल च्या उदघाट्नप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष राजेश कवडे,माजी सभापती विलासराव आहेर,बाजार समितीचे संचालक अमोल नावंदर,युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष फरहान खान,केंद्रीय राज्यमंत्री ना.डॉ.भारती पवार यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण रोंदळ,भाजपचे दत्तराज छाजेड,सागर फाटे,माजी आ.धात्रक,भास्कर कदम,संतोष गुप्ता,डॉ.परितोष गुप्ता आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आमदार सुहास कांदे म्हणाले की , नांदगाव शहरात खरे तर काही व्यापारी वर्गाच्या मदतीने मीच असे एक हॉस्पिटल उभारणार होतो.आणि त्यात राजीव गांधी जीवनदायी योजना व महात्मा फुले योजनेतून मतदार संघातील गोरगरीब जनतेवर मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करणार होतो.मात्र आता गुप्ता कुटुंबंाने या हॉस्पिटल उभारल्याने ह्या हॉस्पिटलला वरील सुविधा येत्या वर्षात उपलब्ध करून देईन असे आमदार सुहास कांदे यांनी सांगितले. यावेळी दत्तराज छाजेड, माजी आ.धात्रक,भास्कर कदम,श्री.रोंदळ यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान आ.कांदे यांनी यावेळी उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संतोष गुप्ता यांना उद्देशून या गुप्ता कुटुंबंांत स्त्री,पुरुष असे अनेक डॉक्टर आहेत.मात्र संतोष अण्णा एम.डी.डॉक्टर आहेत.पण ते राजकारणातले...त्यांनी ही डॉक्टर व्हायला हवे होते.पण त्यांनी राजकारणाची वाट निवडली.पण असो राजकारणात ही त्यांनी चांगला जनसंपर्क वाढवला आहे. त्यांच्या स्वप्नात ही नसताना त्यांना मी उपगराध्यक्ष पदाची संधी दिली होती.याची आठवण आ.सुहास कांदे यांनी त्यांना यावेळी करून दिली.
Thursday, February 22, 2024
नांदगाव येथे कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विविध मागण्यासाठी लाँग मार्च!! शेतकरी, कष्टकरी रॅलीत सहभागी,
नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव येथे कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शहरातून आंबेडकर चौक येथुन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते . बहुसंख्य शेतकरी बांधवांनी डॉ . बाबासाहेब आंबेडकर करांना अभिवादन करुन नाशिक कडे रवाना झाले. कॉम्रेड धर्मराज शिंदे जिल्हा नेते किसान सभा यांच्या नेतृत्वाखाली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नाशिक जिल्हा कार्यालयावर शेतकरी , कष्टकरी येत्या सोमवारी दि. २६ फेब्रुवारी रोजी धडकणार आहे. नांदगाव येथून बहुसंख्य शेतकरी कष्टकरी बांधव हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून नाशिककडे विविध मागण्यांसाठी लॉंग मार्च करत नाशिक जिल्ह्याकडे रवाना झाले. या लॉंग मार्च मध्ये काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष मनोज चोपडे यांनी सर्वांचे स्वागत केले व जाहीर पाठिंबा दिला. मोदी सरकारचे धोरण हे कष्टकरी शेतकरी यांच्या विरोधी असून दिल्ली येथे शेतकऱ्यांवर अश्रू धूर धुराचा वापर करून गोळ्या झाडण्यात येत आहे. या दडपशाहीचा मुकाबला सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांनी केला पाहिजे भारतीय संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी एकत्र आले पाहिजे.असे आवाहन काँग्रेस शहराध्यक्ष मनोज चोपडे यांनी आपल्या शब्दातून केले आहे. यावेळी असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.
नांदगावात प्रभु श्री विश्वकर्मा महाराज जयंती उत्सव साजरा ,
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव शहरात सुतार समाजाचे आराध्य दैवत प्रभु श्री विश्वकर्मा महाराज जयंती उत्सव सालाबादाप्रमाने नांदगाव येथील हनुमाननगर मधील श्री विश्वकर्मा महाराज मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी १०ः०० वाजता श्री विश्वकर्मा महाराजांच्या मुर्तीची विधिवित पुजा व सत्यनाराण महापुजा रमेश पेंढारकर व सौ .फुलवंता पेंढारकर यांनी सपत्नीक केली. तर महाआरती विश्वकर्मा सुतार समाज विकास संस्थेचे पदाधिकारी यांनी सपत्नीक यांनी केली.
यावेळी कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक ,चंद्रशेखर कवडे,अँँड सचिन साळवे, आप चे जिल्हा उपाध्यक्ष विशाल वडघुले, संतोष गोसावी नंदू पाटील,जेष्ट पत्रकार संजीव निकम, सुरेश शेळके, पत्रकार संजय मोरे,अनिल आव्हाड, प्रमित आहेर, सचिन बैरागी, महेंद्र पगार,अनिल धामणे, राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते.जयंतीनिमित्त समाज बांधवांना जेष्टे नेते बापुसाहेब कवडे, आमदार सुहासआण्णा कांदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेज कवडे यांनी शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी कार्यक्रमास उपस्थित प्रमुख अतिथींचा स्वागत विश्वकर्मा सुतार समाज विकास संस्थेच्या वतीने करण्यात आले.या प्रसंगी प्रमुख अतिथी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की श्री विश्वकर्मा भगवान हे सर्व समाज्याचे दैवत आहे. तालुक्यात सुतार समाजाचे संघटन असून याचे फलित नांदगाव शहरात प्रभू विश्वकर्मा भगवान चे भव्य मंदिर उभारले असून या बरोबरच या ठिकाणी इतर विकास कामे जोमात सुरू आहे. आमदार सुहासआण्णा कांदे यांनी मंदिर परिसरात सभामंडपसाठी निधी दिल्याबद्दल समाजाच्या वतीने आभार मानण्यात आले. यावेळी उपस्थित महिलानी हळदी कुंकवाच कार्यकम झाला.उपस्थिताना विश्वकर्मा युवा मंडळाचे अशोक पेंढारकर यांच्या तर्फे महाप्रसाद वाटप करण्यात आला.या प्रसंगी विश्वकर्मा सुतार समाज विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संजय कदम , संचालक नंदुलाल अहिरे,सुभाष पेंढारकर,मधुकर खैरनार,राजेंद खैरनार, दिगंबर गवळे,दयाराम सूर्यवंशी,सचिव बाबासाहेब कदम, खजिनदार दिपक मोरे, अशोक कदम , सोपान कदम,बाळासाहेब जाधव, सुनील शेलार ,संतोष जाधव,विश्वकर्मा युवा मंडळाचे किरण हिरे,जयवंत पेंढारकर, नरेंद्र सूर्यवंशी,सौरभ मोरे,समाधान कदम,स्वप्नील खैरनार,समाधान खैरनार, रोशन हिरे, मयूर कदम, श्री विश्वकर्मा महिला मंडळाच्या संगिता कदम,सुलोचना खैरनार,उषा पेंढारकर,सुंनदा आहिरे, विद्या कदम,पुष्पा मोरे,निता जाधव,दिपाली आहिरे,सोनाली जाधव,फुलवंता पेंढारकर, संगिता हिरे, राणी शेलार,ज्योती शेलार आदी महिला मोठया संख्येने उपस्थित होते.
Wednesday, February 21, 2024
नांदगाव शहरातील शॉपिंग सेंटरच्या गाळ्यांची भाडेकरार लिलाव प्रक्रिया जाहीर,
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषदेच्या मालकीच्या महात्मा फुले चौकातील शॉपिंग सेंटरच्या गाळ्यांची जाहीर भाडेकरार लिलाव प्रक्रिया मंगळवारी नगरपरिषदेच्या वतीने शहरातील जैन धर्मशाळा या ठिकाणी सकाळी महात्मा फुले चौक येथील सिटी सर्वे नंबर 2524 मधील शॉपिंग सेंटरच्या गाळ्यांचे जाहीर भाडेकरार लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली. या लिलाव प्रक्रियेसाठी इन कॅमेरा व्यवस्था ठेवण्यात येऊन मुख्याधिकारी तथा प्रशासक विवेक धांडे यांचे प्रमुख मार्गदर्शनात तसेच जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून मंडळ अधिकारी नांदगाव उपस्थित होते.
लिलाव प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता. यावेळी तळमजल्यावरील सर्व गाळ्यांचे, पहिल्या मजल्यावरील सर्व गाड्यांचे, तसेच दुसऱ्या मजल्यावरील दोन गाळ्यांचे लिलाव झाले. यात एकूण ७३ गाळ्यापैकी ४६ गाड्यांचे लिलाव पूर्ण झाले आहेत. यशश्वी सर्वोच्च बोली आसाराम दुबे (रक्कम, 51,40000/-) यांनी लावली. सर्व प्रक्रियेत एकूण ना परतावा अनामत रक्कम ५,५०,५०,०००/- रूपये इतकी बोली लावलेली आहे. यशस्वी बोली धारकांनी व ओटे धारकांनी पुढील पंधरा दिवसात करारनामे करून द्यावे. तसेच शॉपिंग सेंटरची सर्व किरकोळ दुरुस्ती करून सर्व ओटे व गाळे लवकरच व्यवसायासाठी चालू करून देण्यात येणार आहे. लिलाव प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी नांदगाव नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी श्रीमती मुक्ता कांदे, कर निरीक्षक राहुल कुटे, लेखापाल संतोष ढोले, लेखा परीक्षक सतीश कुमार खैरे, प्रकल्प अधिकारी आनंद महिरे, संगणक अभियंता श्रीमती रोशनी मोरे, वरिष्ठ लिपिक विजय कायस्थ, बीबी शिंदे,अरुण निकम, अंबादास सानप,रामकृष्ण चोपडे, आकाश जाधव,दीपक वाघमारे, अनिल पाटील,सुनील पवार, निलेश देवकर,यांनी विशेष मेहनत घेतली यावेळी सर्व नागरिक व पत्रकार बांधव उपस्थित होते.
Monday, February 19, 2024
मध्य रेल्वे(मुंबई )चे जनरल मॅनेजर रामकरण यादव यांनी मनमाड वर्कशॉपला दिली भेट,
मनमाड (विशेष प्रतिनिधी ) - मध्य रेल्वे(मुंबई )चे जनरल मॅनेजर रामकरण यादव यांनी मनमाड वर्कशॉपला भेट दिली.यावेळी ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड च्या शिष्टमंडळाने माजी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या नेतृत्वाखाली जनरल मॅनेजर रामकरण यादव यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.
यावेळी मुख्य कारखाना प्रबंधक मयंकसिंग, सिनियर सेक्सन इंजिनिअर हरिष दोंदे आदी उपस्थित होते. कामगार समस्या संदर्भात एक निवेदन दिले. या निवेदनात (१)मनमाड वर्कशॉप मधील ग्रुप डी व सी च्या रिक्त पदे भरण्यात यावे.
मनमाड वर्कशॉप मध्ये एकूण जागांपैकी ७७%पदे ही ग्रुप डी चे रिक्त आहे.२३%पदे भरली आहे.
आर.आर.बी. कडून रिक्त पदे भरण्यात यावी.
(२) नाशिक ते मनमाड या दरम्यान अनेक रेल्वे कर्मचारी हे कामानिमित्त प्रवास करतात.
पण सदर कर्मचाऱ्यांना सकाळी ८:०० येण्यासाठी असलेली देवळाली भुसावळ पॅसेंजर च्या वेळेत कोरोणा नंतर बदल करण्यात आला आहे.त्यामुळे अपडाऊन करण्याऱ्या रेल्वे कर्मचारी वर्गाला त्रास सहन करावा लागतो तरी देवळाली भुजबळ पॅसेंजर ची वेळेत बदल करून पुर्वीच्या वेळ करावी.
(३) पद्दोन्नती आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी.
(४) मनमाड रेल्वे स्टेशनवर, मनमाड रेल्वे कॉलनी व मनमाड रेल्वे वर्कशॉप मध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व पाणी च्या प्रश्न तातडीने मार्गी लावा
(५) मनमाड वर्कशॉप मधील जनरल विभागासाठी नवीन वर्कऑडर मिळावी किंवा नवीन काम मिळावे
शिष्टमंडळात झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ आहीरे, कारखाना शाखा चे खजिनदार संदिप धिवर,कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव सागर गरूड, माजी कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, माजी अतिरिक्त सचिव सुनील तगारे,विनोद खरे, संजय केदारे,विशाल त्रिभुवन,गणेश केदारे आदी होते.
मांडवड येथे शिवजयंती उत्साहात साजरी, लेझिम नृत्य कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण,
मांडवड (प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यातील मांडवड येथे म.वि.प्र.समाजाचे स्व.शरद आण्णा आहेर जनता विद्यालय मांडवड येथे "शिवजयंती" मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवप्रतिमेचे पूजन शालेय स्कूल कमिटीचे अध्यक्ष प्रशांत आहेर यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शिवरायांची आरती आयोजित करण्यात आली होती.क्रीडा शिक्षक संदीप आहेर यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी केलेल्या लेझीम नृत्य सर्वांसाठी कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले होते. लेझीम पथकाद्वारे छत्रपती शिवरायांच्या वेशभूषे मध्ये मध्ये इयत्ता दहावीचा विद्यार्थी श्रेयस निकम तर जिजाऊंच्या वेशभूषेत इयत्ता दहावीची विद्यार्थ्यांनी सिद्धी उगले ही होती. लेझीम नृत्यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी केसरी रंगाचे फेटे बांधून गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी शालेय स्कूल कमिटी सदस्य रामराव मोहिते, वाल्मीक थेटे,सर्जेराव थेटे, दिलीप आहेर,अशोक निकम, बापूसाहेब आहेर,सिताराम पिंगळे तसेच पालक वर्गातून सागर आहेर,सुखदेव थेटे, दत्तात्रय थेटे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका कांबळे एस. एस. यांनी केले. या कार्यक्रमासाठी मविप्रचे संचालक अमित बोरसे तसेच गावातील ज्येष्ठ नेते विठ्ठल आहेर यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
Subscribe to:
Posts (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - गुरुवारी दि.१ रोजी नांदगाव नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सागर हिरे यांनी नांदगाव नगरपरिषदेच्या ...