नांदगाव ग्रामीण (प्रतिनिधी ) - कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ,साकोरे येथे गुरुवारी दि. १९ सप्टेंबर रोजी शाळेतील नूतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाले . या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड मा . भगीरथजी शिंदे ,इमारत उद्घाटन शुभहस्ते माजी खासदार, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा राम शेठजी ठाकूर ,प्रमुख उपस्थिती उत्तर विभागीय कार्यालय विभागीय अधिकारी मा .बोडखे साहेब ,सहाय्यक विभागीय अधिकारी तोरणे साहेब ,वडजे बापू , जिल्हा परिषद सदस्य व स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष मा . रमेश उग्रसेन बोरसे ,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सतीषभाऊ बोरसे ,विद्यालयाच्या प्राचार्या सौ. जगताप मॅडम या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत नूतन इमारतीचे उद्घाटन झाले .या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे गणित, विज्ञान विषयाचे शिक्षक सोनवणे एम. पी.(सर) यांना World Humanity Commission (USA ) या संघटनेमार्फत राष्ट्रीय शिक्षक रत्न पुरस्कार मिळाला आहे. या सर्व मान्यवरांच्या हस्ते सरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ग्रामस्थ , शाळेतील सर्व विद्यार्थी, शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनीही सरांचे अभिनंदन केले.
साप्ताहिक नांदगाव दुनिया संपादक- मोहमद नवाब शेख
Friday, September 20, 2024
नांदगाव शहरात ईद-ए-मिलाद निमित्त शांतीपूर्ण शोभायात्रा, मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित,
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव शहरात ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त काढण्यात आलेल्या आकर्षक मिरवणुकीने नांदगाव शहरात दणाणुन गेले होते. मिरवणुकीनतंर ‘या अल्लाह जगात शांतता नांदू दे, देशात एकात्मता नांदू दे , देश महासत्ता होवू दे’ अशी प्रार्थना करत मुस्लिम समाज बांधवांतर्फे अल्लाहला कडे प्रार्थना करण्यात आली. सुन्नी जामा मस्जिद व अहेले सुन्नत वल जमाअत व जमात रजा-ए-मुस्तफा नांदगाव तर्फे सकाळी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.मुस्लिम समाज बांधवांचा सर्वात पवित्र सण ईद-ए-मिलादुन्नबी बुधवार साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळी नऊ वाजता नांदगाव एच् .आर. हायस्कूल कोट गल्ली जामा मस्जिद येथून मिरवणुकीची सुरुवात झाली.त्यानंतर मुख्य मार्गाने कालीका चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौका , शनी मंदिर येथून हुतात्मा चौक, डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा गांधी चौक, महात्मा फुले चौक , दत्त मंदिर तसेच गावातील मुख्य रस्त्याने परत एच्. आर. हायस्कूल येथे समारोप करण्यात आला. ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत करण्यात येवून गोड पदार्थाचे वाटप करण्यात आले असून तसेच मिरवणुकीत सहभागी बांधवांकडून घोषणा देण्यात येत होत्या. तसेच ध्वनी प्रक्षेपकावरुन नातपाक व सलातो सलामचे पठण करण्यात येत होते. मिरवणुकपूर्वी कार्यक्रम प्रसंगी नांदगाव पोलीस स्टेशनचे यांच्या सह पोलिस उपनिरीक्षक यांच्या पोलिस अधिकारी कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
या प्रसंगी अध्यक्ष मुज्जमील शेख, उपाध्यक्ष मोसीन डाफेदार , कलिम शेख, ग्यासोद्दीन शेख, समिर पठाण, शाकीर पठाण, माजी नगरसेवक याकुब शेख, माजी नगरसेवक एकबाल शेख , नासिर पठाण , शरीफ शेख, शकूर शेख, सेक्रेटरी मदरसा बबलू सय्यद , दाऊद गणी शेख शरीफ, पिंजारी समाज अध्यक्ष मन्सुरी आदीसह मुस्लीमबांधव , बाळगोपाळ उपस्थित होते.
Sunday, August 25, 2024
नांदगाव शहरात भव्य स्वयं रोजगार निर्मिती, प्रदर्शन व रोजगार मेळाव्याचे आयोजन,
नांदगाव (प्रतिनिधी ) - सद्यस्थितीत ११० कंपन्या आमच्याशी संर्पक साधून आहेत, मात्र आम्ही ५०० कंपन्याना जोडून घेण्याचे लक्ष्य ठेवले आहे. जेणेकरून मतदार संघातील प्रत्येक घरातील माझ्या भगिनींना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणे शक्य होईल. असे प्रतिपादन आमदार सुहास कांदे यांनी केले.
. नांदगाव शहरातील हनुमाननगर येथील आमदारांच्या देवाज बंगल्यावर मतदार संघातील महिला भगिनींच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी भव्य स्वयं रोजगार निर्मिती, प्रदर्शन व रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना आमदार श्री. कांदे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर या उपक्रमाच्या प्रणेत्या समाजसेविका सौ.अंजुम कांदे, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख विद्या जगताप, मनमाडचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी, तालुका अधिकारी डॉ. संतोष जगताप, राजेंद्र पवार,अश्विनी जाधव, लीना पाटील,रोहिणी मोरे, संगीता बागुल, राहुल कुटे, राजेंद्र भाबड, दत्तू निकम, अनिल रिंढे, दीपक मोरे आदी उपस्थित होते.
. ' ज्या कंपन्या आपल्याशी जोडल्या जाणार आहेत, त्यांच्याशी आपण पाच वर्षाचा करार करणार असून, दरवर्षी जशी कच्चा मालात वाढ होईल. अगदी त्याचप्रमाणे जो पक्का माल तुम्ही तयार कराल त्याच्या रकमेत ही वाढ करण्याची अट या करारात असेल. असे स्पष्ट करून आ. श्री. कांदे पुढे म्हणाले की, इतकेच नाही तर कच्चा मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्यासाठी जी मिशनरी लागणार आहे,ती घेण्यासाठी १०० टक्के कर्जपुरवठा आम्ही करणार आहोत.तुमचे सिबिल कमी असो वा जास्त कर्ज घेण्यास कुठलंही अडचण येणार नाही. आणि कच्चा माल घेण्यासाठी ठेव द्यावी लागते. पण तुम्हाला त्याची चिंता करण्याची गरज नाही. कारण ते सर्व पैसे सौ. अंजुम कांदे ह्या देतील.आलेल्या उत्पनातून याची परतफेड तुम्हाला करावी लागेल.आणि मी खात्रीने सांगतो की, फक्त तीन वर्षात ह्या मशीन ची पूर्ण रक्कम तुम्ही फेडून टाकाल व हे मशीन तुमच्या मालकीचे होईल.उत्कृष्ट उत्पादन व उत्पन्न घेणाऱ्या बचत गटाना पुरस्कार देण्यात येतील. असे ही आमदार कांदे यावेळी सांगितले.
. या स्वयं रोजगाराच्या प्रणेत्या सौ. अंजुम कांदे उपस्थित महिलांना उद्देशून म्हणाल्या की, तुमच्या भरवश्यावर ही इतकी मोठी धाडसी उडी घेतली आहे. आणि यात जी गुंतवणूक करणार आहोत. त्यात शासनाचा एक रुपया ही नाही. सर्व स्वनिधी आहे. आणि आपल्या आमदारांनी तुमच्या आर्थिक संपन्नतेसाठी हे पैसे आपल्याला उसने दिले आहेत. त्यामुळे आपणही तितक्याच जबाबदारीने काम करून अण्णांचा विश्वास सार्थ ठरवायचा आहे. अन आपली,कुटूंबाची प्रगती साधायची आहे. स्त्री पुरुष तुलना करत बसण्यापेक्षा कुटूंबाचे हित जोपासून आर्थिक उन्नती साधायची आहे.या स्वयं रोजगारातून प्रत्येक महिलेला दर दिवशी किमान २०० ते २५० रुपये कमावता येतील. असेच उद्योग आपण निवडले आहेत.असे सौ. कांदे म्हणाल्या.
. याप्रसंगी अँड. विद्या कसबे, हसीना शेख, ज्योती महाजन, सुनीता कदम, सविता नवले, श्री. महिरे, यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच सौ. कांदे यांचा वाढदिवस यावेळी हजारो महिलांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
. मेळाव्यानंतर शहरातील गुप्ता लॉन्स येथील कच्चा मालाचे पक्क्या मालात रूपांतर करणाऱ्या मशीन प्रदर्शनाचे उदघाट्न आमदार सुहास कांदे व सौ. अंजुम कांदे यांचे हस्ते करण्यात आले. व यावेळी या सर्व मशीनची आमदार पती -पत्नी व सर्व महिलांनी पाहणी करून वापराबाबतची तपशीलवार माहिती जाणून घेतली.यात कापूर, अगरबत्ती, कापूस वात, डाळ मिल, पत्रावळी, टिशू पेपर, सोलर ड्रायर, केळी चिप्स, पापड, ऑफसेट, आईस्क्रीम, ऊस रसवंती, आटा चक्की, मिर्ची ग्राईडर, स्क्रबर, पॉपकॉर्न, शेवई, आदीसह शेकडो मशीन चे प्रदर्शन भरवण्यात आले होते. हे प्रदर्शन अजून दोन दिवस सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळात पाहण्यासाठी खुले असणार आहे.
. यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख फरहान खान, ज्ञानेश्वर कांदे, किरण कांदे, अप्पा कांदे, सागर हिरे, शशी सोनावणे, सुनील जाधव, लाला नागरे, भावराव बागुल,प्रकाश शिंदे,आदीसह शिवसेना महिला आघाडी, पदाधिकारी, युवासेना, तसेच मतदार संघातून आलेल्या हजारो महिला, बचत गटाच्या सदस्या, आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रास्ताविक राजेंद्र देशमुख यांनी केले, तर सूत्रसंचालन संजय आहेर यांनी केले.
नांदगावतील नवीन इदगाह व शादीखानाचे आमदार सुहास कांदे यांचे हस्ते उद्घाटन,
नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांच्या सौ. अंजुम कांदे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून नांदगाव शहरात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या इदगाह व शादीखाना चे उदघाट्न सौ. अंजुम सुहास कांदे यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी अध्यक्षपदावरून ते बोलत असताना, ' जी मुस्लिम कुटुंबं गरीब आहेत, त्यांच्या ही मुलामुलींची लॉन्स मध्ये लग्न करण्याची इच्छा असतेच ना, म्हणून हा शादीखाना उभारून दिलाय. आता या आलिशान शादीखाना मध्ये गरीब मुस्लिम बांधवांच्या मुलामुलींची लग्ने आता फक्त १०१ रुपयात लावली जातील. तशी व्यवस्था करण्यात आली आहे. असे प्रतिपादन आमदार सुहास कांदे यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर सौ. अंजुम कांदे, फरहान खान, इकबाल शेख,शाईनाथ गिडगे, अल्ताफबाबा खान, मयूर बोरसे, सुनील हांडगे, महेंद्र शिरसाठ, सौ. उज्वला खाडे, रोहिणी मोरे, सुजाता कातकडे, ज्ञानेश्वर कांदे, बबलू पाटील, अमजद पठाण,जाफर मिर्झा, असिफ पठाण, रफिक पठाण, हाजी मुनावर, आदी सह जेष्ठ मुस्लिम बांधव उपस्थित होते.
आमदार सुहास कांदे पुढे म्हणाले की, सौ. अंजुम च्या वाढदिवस निमित्त या शादी खाना साठी सुमारे ६० लाख रुपयांची स्वयंपाकासाठी भांडी, टेबल, खुर्च्या दिल्या आहेत. आणि या भांड्यांसाठी कुठलेही भाडे आकारले जाणार नाही. याउलट दरवर्षी १० गरीब लोकांच्या मुलामुलींच्या लग्नाचा खर्च मी स्वतः करेन. ह्या शादी खाना च्या दुमजली इमारतीचा प्रस्ताव ही मंजूर झाला असून, येत्या आठ दिवसात ते काम व येथे पेव्हर ब्लॉक, संपूर्ण संरक्षक कंपाउंड ही बांधून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माझ्या मतदार संघातील सर्व हिंदू बांधव व मुस्लिम बांधव एकोप्याने राहत आहेत. त्यांच्यात धर्मावरून कधीच वाद मी होऊ देणार नाही. व दोघांपैकी कुणावर ही अन्याय होणार नाही. याची सतत काळजी मी घेईन. तसेच मतदार संघातील ज्या ज्या गावात मुस्लिम बहुल वस्ती आहे, त्या प्रत्येक ठिकाणी शादी खाना व ईदगाह बांधून दिले आहेत. असे ही आ. कांदे शेवटी म्हणाले.
तर सौ. कांदे म्हणाल्या की,माझे आजोबा नांदगाव मध्ये अनेक वर्षे वास्तव्य करून होते.येथील मुस्लिम बांधवांच्या समस्याकडे आज पर्यंत कुणीच लक्ष दिले नाही. मात्र आपले आमदार जात पात, धर्म भेद मानत नाही. म्हणून सर्वच जाती धर्माच्या घटकांना सोबत घेऊन विकासकामे करत आहेत. यावेळी हाजी मुनावर, अँड. युनूस शेख, अय्याज शेख, शबाना शेख, बब्बू शेख, रियाज पठाण,आदीनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास प्रमोद भाबड,सागर हिरे, सुनील जाधव, बापू जाधव,आदीसह आ. सुहास अण्णा कांदे रहेनुमा फाउंडेशन चे अध्यक्ष सईद हाजी,सचिव अय्याज शेख,कार्याध्यक्ष रियाज पठाण,सदस्य वसीम खान, नईम शेख, इकबाल शेख, समन्वय समिती सदस्य हाजी मुनव्वर पठाण,हाजी जहीर,इकबाल दादा शेख,ॲड युनूस शेख,लतिफ सुफर,चिराग सेठ,खलील जनाब आदी सह हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते.
Sunday, July 28, 2024
नांदगाव विधानसभा मतदार संघातील विविध गावांत विकासकामांचे सौ. अंजुम कांदे यांच्या हस्ते लोकार्पण,
नांदगाव ग्रामीण (प्रतिनिधी ) - जे छोटे -छोटे समाज विखूरलेले होते, त्यांना या विकासकामांच्या माध्यमातून आमदार सुहास अण्णांनी एकत्र आणले. ही त्याचीच फलश्रुती आहे की, तुम्ही सर्व बारा बलुतेदार आज या सभामंडप लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने एका छताखाली जमा झालात. असे प्रतिपादन समाजसेविका सौ. अंजुम सुहास कांदे यांनी केले.
नांदगाव विधानसभा मतदार संघातील विविध गावांत विकासकामांचे लोकार्पण करण्यातआले.त्यात माणिकपूंज, चांदोरे, व पळाशी येथे ३३ लाख ७५ हजार रुपये खर्चाच्या तीन अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण करण्यात आले, तर न्यायडोंगरी येथे बारा बलुतेदार समाजाच्या बहुउद्देशीय कामासाठी बांधण्यात आलेल्या सभामंडपाचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी सौ. कांदे बोलत होत्या.
यापूर्वीच्या आमदारांनी तालुक्याच्या ठिकाणी ठराविक कामे केली, मात्र गावांमध्ये पाच लाखाचे ही काम केल्याचे उदाहरण कुणी देत नाही. मात्र आमदार सुहास अण्णांनी लाख सोडाच, कोटीचे ही आकडे मागे सोडलेत. आज एकही वस्ती, वाड्या, गाव असे नाही की, जेथे दोन कोटी पेक्षा कमी काम झालेय. शेकडो कोटीच्या पाणी योजना अंतिम टप्यात आहेत. सामाजिक अस्मिता जपण्यासाठी ही करोडो रुपये खर्च केलेत. असे ही सौ. कांदे शेवटी म्हणाल्या.
. यावेळी सौ. कांदे यांच्या हस्ते शेकडो गरजू महिला, तरुणांना जातीच्या दाखल्यांचे घरपोहोंच वितरण करण्यात आले.
. यावेळी माजी सभापती विलासराव आहेर,किरण कांदे,शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख विद्या जगताप, संगीता बागुल, रोहिणी मोरे,अँड. विद्या कसबे,नरेंद्र आहेर,मुख्यसेविका श्रीमती जयश्री गवळी,उज्वला मिस्त्री, प्रदीप थोरात, अशोक कोल्हे, प्रकाश आव्हाड, प्रवीण घोटेकर, कविता राऊत, सोनाली जाधव,शाईनाथ रामकर, रामदास आव्हाड, सुकदेव मेंगाळ,खंडू घोटेकर, साकृबाई मेंगाळ, समाधान वाघ, शबीर शेख, धर्मा आव्हाड, अलका कोल्हे, किरण मोहिते, सुवर्णा वाघ, जालम आहेर, राजू तीळवणे, विजय आहेर, सुभाष नहार,विजय निकम, दत्तू लाड, योगेश जाधव, प्रशांत सोनावणे, शशी सोनावणे, बाबासाहेब कदम, भावराव बागुल,संतोष कांदे,बाबा ढोमसे, दीपक शेलार, सिद्धेश खरोटे, सद्दाम शेख,शलैश मिस्त्री आदी सह शेकडो ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.
Saturday, July 27, 2024
दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल,
नांदगाव (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्डाच्या शुक्रवार दि. २६ जुलै रोजी होणाऱ्या पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात राज्यात अनेक जिल्ह्यांत होणाऱ्या अतिवृष्टी मुळे बदल करण्यात आला आहे. अशी माहिती नांदगाव तालुका गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले यांनी सोशल मिडियाला दिली आहे. त्यानुसार १० वी चा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग-२ (७२-२) शुक्रवार दि. २६/०७/२०२४ रोजी सकाळ सत्र ११-०० ते १-०० होणारा पेपर नवीन वेळापत्रकानुसार. विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग-२(७२-२) हा पेपर बुधवार दि.३१/०७/२०२४ रोजी सकाळ सत्र ११-०० ते १-०० वाजता होणार आहे. तर बारावीचा शुक्रवार दि.२६/०७/२०२४ रोजी सकाळ सत्र ११-०० ते २-०० या वेळेत होणारा पेपर वाणिज्य संघटन व व्यवस्थापन (५१) व अर्थशास्त्र व तंत्रज्ञान (६२),
एम.सी.व्ही.सी.पेपर-२ EB to XB-२० विषय हे पेपर आता नवीन वेळापत्रकानुसार शुक्रवार दि. ९/०८/२०२४ रोजी सकाळ सत्र ११- ते २-००या वेळेत संबंधित केंद्रावर आयोजित करण्यात आला आहे.
यांची संबंधित परीक्षार्थीनी नोंद घ्यावी. व वरील बदल झालेल्या वेळापत्रकाची झालं घेऊन परीक्षार्थीनी झालेल्या बदलानुसार परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे असे मेधा निरफराके सहसचिव राज्य मंडळ, पुणे -४ व नांदगाव तालुका शिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले यांनी कळविले आहे.
नांदगाव पंचायत समिती कार्यालयावर आधारवड संस्थेच्या वतीने ५ ऑगस्टला बिऱ्हाड मोर्चा निघणार,
नांदगाव (प्रतिनिधी) - शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिला व पुरुषांच्या अपघाती विमा चपराशी कम कुक या पदावर नियुक्ती देण्यात यावी सामाजिक सुरक्षा लागू करण्यात यावी, थकीत इंधन बिल व मानधन दर महिन्याला देण्यात यावे
कर्मचाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने कामावरून कमी करू नये त्यांच्या कामाशिवाय अतिरिक्त कामे सांगू नये. दरवर्षी करार नामा करण्याची पद्धत बंद करून त्याऐवजी कामावर लागल्या पासून नियुक्ती पत्र देण्यात यावे तसेच शापोआ कर्मचाऱ्यांना ओळख पत्र व वर्षातून दोन गणवेश देण्यात यावे यासह अनेक समस्या सोडवण्यासाठी येत्या ५ ऑगस्ट रोजी आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने नांदगाव पंचायत समितीवर बिऱ्हाड मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष संगिता सोनवणे यांनी दिली . संस्थेच्या आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले.
शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिला पुरुषांच्या अनेक समस्या आहेत या समस्या सोडवण्यासाठी आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने अनेक आंदोलन करण्यात आले आहे. त्याचा राज्य सरकारने सरकारने विचार करुन पगारात वाढ करण्यात आली . मात्र आमच्या इतर मागण्या अद्यापही प्रलंबित आहे. त्या सोडवण्यासाठी आम्ही लढत आहोत याचाच भाग म्हणून आम्ही आता येत्या ५ ऑगस्ट रोजी बिऱ्हाड आंदोलन करणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष संगिता सोनवणे यांनी दिली आहे. या बैठकीत नांदगाव येवला मनमाड मालेगाव तालुक्यातील शालेय पोषण आहार समितीच्या सदस्य उपस्थित होत्या. यावेळी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. मोर्चा करण्यासाठी व बिऱ्हाड आंदोलन करण्यासाठी तालुक्यातील आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सदस्यां उपस्थित राहणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले यावेळी अध्यक्ष संगिता सोनवणे सचिव आशा काकळीज, सरला मोढे ,संगिता कुलकर्णी, संगिता मोकळ,शोभा भोसले, ज्योती मोरे, पुष्पा वाघ,मनीषा भाबड,रत्ना सोनवणे, योगिता सोनवणे, अलका आयनोर,नफिसा शेख,येवला तालुक्यातील संजय जमधाडे, सुनील उशिरे यांच्यासह शेकडो शालेय पोषण आहार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
Subscribe to:
Posts (Atom)
क.भा.पा. विद्यालयातील एम.पी.सोनवणे सरांना WHC संघटनेतर्फे राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्कार,
नांदगाव ग्रामीण (प्रतिनिधी ) - कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ,साकोरे येथे गुरुवारी दि. १९ सप्टेंबर र...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुका हा शांतताप्रिय तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात जातीवा...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - एकमेकांच्या सुखदुःखात कुटुंबंांची एकी कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे नांदगाव शहरातील गुप्ता कुटुंबं...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव - येवला रोडवर दहेगाव फाटा येथे शुक्रवारी सकाळी कंटेनरच्या टायरखाली सापडून सुनीता माणिक जाधव ( व...