नांदगाव (प्रतिनिधी) - शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिला व पुरुषांच्या अपघाती विमा चपराशी कम कुक या पदावर नियुक्ती देण्यात यावी सामाजिक सुरक्षा लागू करण्यात यावी, थकीत इंधन बिल व मानधन दर महिन्याला देण्यात यावे
कर्मचाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने कामावरून कमी करू नये त्यांच्या कामाशिवाय अतिरिक्त कामे सांगू नये. दरवर्षी करार नामा करण्याची पद्धत बंद करून त्याऐवजी कामावर लागल्या पासून नियुक्ती पत्र देण्यात यावे तसेच शापोआ कर्मचाऱ्यांना ओळख पत्र व वर्षातून दोन गणवेश देण्यात यावे यासह अनेक समस्या सोडवण्यासाठी येत्या ५ ऑगस्ट रोजी आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने नांदगाव पंचायत समितीवर बिऱ्हाड मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष संगिता सोनवणे यांनी दिली . संस्थेच्या आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले.
शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिला पुरुषांच्या अनेक समस्या आहेत या समस्या सोडवण्यासाठी आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने अनेक आंदोलन करण्यात आले आहे. त्याचा राज्य सरकारने सरकारने विचार करुन पगारात वाढ करण्यात आली . मात्र आमच्या इतर मागण्या अद्यापही प्रलंबित आहे. त्या सोडवण्यासाठी आम्ही लढत आहोत याचाच भाग म्हणून आम्ही आता येत्या ५ ऑगस्ट रोजी बिऱ्हाड आंदोलन करणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष संगिता सोनवणे यांनी दिली आहे. या बैठकीत नांदगाव येवला मनमाड मालेगाव तालुक्यातील शालेय पोषण आहार समितीच्या सदस्य उपस्थित होत्या. यावेळी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. मोर्चा करण्यासाठी व बिऱ्हाड आंदोलन करण्यासाठी तालुक्यातील आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सदस्यां उपस्थित राहणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले यावेळी अध्यक्ष संगिता सोनवणे सचिव आशा काकळीज, सरला मोढे ,संगिता कुलकर्णी, संगिता मोकळ,शोभा भोसले, ज्योती मोरे, पुष्पा वाघ,मनीषा भाबड,रत्ना सोनवणे, योगिता सोनवणे, अलका आयनोर,नफिसा शेख,येवला तालुक्यातील संजय जमधाडे, सुनील उशिरे यांच्यासह शेकडो शालेय पोषण आहार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment