नांदगाव (प्रतिनिधी - परवेज शेख) :- नांदगाव तालुक्याच्या विविध कामाच्या आढावा घेण्यासाठी शुक्रवारी(दि.१९) केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार यांनी तहसिल कार्यालयात बैठक घेऊन जनतेच्या कामे वेळेत करण्याच्या सुचना दिल्या. शासकीय अधिकार्यामध्ये समन्वय नसल्याने रेशन कार्ड देण्यास ३ वर्ष लागले. जनतेला ३ वर्षे लागत असेल तर त्यांना न्याय कोण देणार, संबंधित रेशन वाटप पूर्ण न केल्यास अधिकार्यावर कारवाई केली जाईल अशी ग्वाही दिली.
आढावा बैठकीत पुरवठा विभाग, कृषी, आरोग्य, महावितरण, सार्वजनिक बांधकाम अनेक विभागाचा कामे वेळेत पूर्ण न केल्याने नाराजी सूर दिसून आला. अधिकार्यामध्ये समन्वय असेल तर जनतेची पूर्ण होतील. नांदगाव तालुक्यात इंदिरा गांधी योजनेचे लाभार्थीं कमी असल्याने यांची मला माहिती मिळाली. यात लाभार्थींची संख्या वाढवण्याची सूचना केल्या.
आकडेवारी कमी आहे म्हणजे काम कमी आहे, असा आक्षेप त्यांनी नोंदविला. त्यांनी इतर राज्यात यंत्रणा जलद काम करते, असे सांगितले. योजनेच्या लाभापासून लोक वंचीत राहता कामा नये, ती वेळेत पूर्ण करा . मनरेगाची कामे वाढवा. त्या माध्यमातून जे अनुदान दिले जाते ते गरजूंसाठी मोठे असते, हे लक्षात घ्या,असे आवाहनही त्यांनी केले.
नांदगाव - मालेगाव, मनमाड - येवला रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याच्या कामाचा आढावा घ्यावा लागतो, खड्डे कधी बुजविणार तारीख,वार सांगा अर्धवट रस्त्याची कामे कधी पुर्ण करणार यावर अधिकाऱ्यांची विचारणा केली. बैठकीत तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे, गटविकास अधिकारी गणेश चोधरी, तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील, पोलिस निरीक्षक अनिल कातकडे, नितीन पांडे, संजय सानप, सजन कवडे, तालुकाध्यक्ष बापू जाधव, मूनवर सुलतान आदी उपस्थित होते.
आरोग्य विभागात समन्वय नसल्याने मनमाडच्या लसीकरणसंदर्भात माहिती देता आली नाही. त्यासाठी एकमेकांकडे बोट दाखवण्यात आले. आरोग्य विभागातल्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे, असे खुद्द ना. पवार यांनाच नमूद करावे लागले. शेवटी कामकाजात सुधारणा झाली नाही तर थेट कडक कारवाई करण्याचा इशारा पवार यांनी दिला.
No comments:
Post a Comment