मनमाड ( प्रतिनिधी - परवेज शेख ) - आज मनमाड मध्ये असोसिएशन कार्यालयात शनिवारी (दि.२१) रोजी " संविधान गौरव दिन " साजरा करण्यासंर्दभात बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत "संविधान गौरव दिन " २६ नोव्हें. रोजी साजरा करण्याचे ठरवण्यात आले. यावेळी कार्यक्रम कसा यशस्वी होईल, याविषयी सर्वानी आपापली मते मांडली. संघटन अधिअधिक मजबुत होण्यासाठी चर्चा करण्यात आली.
तसेच मा. मिनाजी ( ADRM सर) , भुसावळ मंडळ, भुसावळ. मनमाड ईथे भेटीसाठी आले असता अॉल इंडिया एससी / एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन ओ/ ला शाखेतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. रेल्वे कामागाराच्या समस्येविषयी निवेदन दिलं. या निवेदनात रेल्वेचे रूग्णालय दिवसा चालु असते पण रात्री वेळेस बंद असल्या कारणाने , कर्मचारी नाईट शिफ्ट मध्ये कार्य करतात जर एखादा कर्मचारी अपघातग्रस्त झाला तर त्याला वेळीच उपचार मिळत नाही म्हणुन रेल्वे रुग्णालय रात्रीच्या वेळेस सूरू करण्यात यावे अशी मागणी निवेदनात केली. यावेळी असोसिएशन चे अध्यक्ष - आयु. प्रदीपजी गायकवाड, सचिव - आयु. चेतन डी. आहिरे, उपाध्यक्ष - आयु. सम्राट ए. गरुड, उपाध्यक्ष- आयु. अजित ई. जगताप, सहसचिव- आयुष्मती . सौ. दीपाली बी. लौंढे, सहसचिव- आयु. राहुल केदारे, आदि पदाधिकारी तसेच सन्मानीय कमिटी मेंबर आयु. दीपक बागुल, आयु. मंगेश चव्हाण , आयु. आकाश शिंदे, आयु. विकी आहिरे, आयु. अंबादास मोरे, आयु. सागर बिडवे, आयु. भीमराव धीवर आदीची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment