Wednesday, March 2, 2022

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आमरण उपोषण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा लक्ष्मी नगर (वाडी) व मांडवड येथे जाहीर सत्कार



 नांदगाव  ( प्रतिनिधी) -  मराठा समाजाच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले होते त्या उपोषणात सक्रिय सहभागी होऊन नांदगाव येथील शिवस्फूर्ती मैदानावर व मनमाड येथील डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ मराठा महासंघाचे पदाधिकारी आमरण उपोषणास बसले होते. 
मराठा समाज आज अनेक समस्यांनी ग्रस्त झाला आहे मराठा समाजाची आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात दिवसागणिक खालावत चालली आहे अशातच मराठा आरक्षण न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने त्यात आणखीन भर पडली आहे आरक्षण केव्हा मिळेल याची आज शाश्वती नाही,मराठा समाजाला यातून थोडाफार आधार मिळावा म्हणून युवराज  संभाजी राजांनी एकूण 15 मागण्या गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र शासनाकडे मांडून त्याचा पाठपुरावा सातत्याने करत होते परंतु महाराष्ट्र शासनाने प्रतिसाद न दिल्याने शेवटी राजेंना आमरण उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला या आंदोलनात मनमाड व नांदगाव च्या मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन आमरण उपोषण सुरू केले होते आंदोलनाची दहाकता बघून शासनाने अखेर तिसऱ्या दिवशी राज्यांच्या सर्व एकूण 15 मागण्या पूर्ण केल्याचे लेखी पत्र दिले आहे आंदोलनाची यशस्वी सांगता झाली आंदोलन यशस्वी करण्यासाठी मनमाड व नांदगाव च्या पदाधिकाऱ्यांनी जी मेहनत घेतली प्रयत्नांची पराकाष्टा करीत आंदोलन यशस्वी केले म्हणून लक्ष्मी नगर (वाडी) गावचे थेट सरपंच बापूसाहेब जाधव,महेंद्र लोखंडे व ग्रामस्थांनी महासंघाचे नाशिक जिल्हा उपप्रमुख भास्कर झाल्टे,नांदगाव तालुका प्रमुख भिमराज लोखंडे, ता.उपाध्यक्ष विशाल वडघुले,उपाध्यक्ष डॉ. विनोद डमरे,मनमाड शहर प्रमुख विष्णु चव्हाण, मनमाड शहर उपाध्यक्ष नानासाहेब घुमरे,व शिवभक्त सौ.संगिताताई सोनवणे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ता.अध्यक्ष निलेश चव्हाण यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
     तसेच मांडवड गावाचे शिवबा ग्रुपचे अध्यक्ष श्री अशोकभाऊ  निकम यांनी मांडवड येथे आमरण उपोषण कार्यात युवराज संभाजी राजे छत्रपती यांना साथ देणारे मराठा महासंघाचे सर्व पदाधिकारी यांचा गावकऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार केला यावेळी आमरण उपोषण कर्त्यांनी आपल्या मनोगतात मांडताना सांगितले की या ठिकाणी येऊन मराठा महासंघाची भूमिका मांडता यावी यामुळे हा सत्कार आम्ही स्वीकारला आहे यावेळी लक्ष्मीनगर चे थेट सरपंच बापूसाहेब जाधव, शिवबा ग्रुपचे अध्यक्ष अशोकभाऊ निकम ,महेंद्र लोखंडे, आर्मी मॅन साहेबराव जाधव,इंजिनिअर सागर आहेर,संदिप आहेर,शंकर आहेर,भास्कर आहेर व इतर बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...