नांदगाव (प्रतिनिधी) - नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुका येथील सर्पमित्र विजय बडोदे यांना वन्यजीव पशुपक्षी संरक्षण सामाजिक संस्था पुणे यांच्या तर्फे 20 फेब्रुवारी 2022 रोजी पुणे नटसम्राट निळूभाऊफुले नाट्यगृहात सर्पतज्ञ निलिमकुमार खैरे यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नांदगाव तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून वन्यजीवांच्या मदतीला धावून जाणारे लोकांच्या मनातील सापाबद्दल भीती व अंधश्रद्धा हे परिसरातील शाळेतील व गावोगावी सर्प जनजागृती व सापांची भीती दूर केली . सर्पदंश झालेले लोकांना वेळेवर उपचारासाठी हॉस्पिटल पोहोचवले आणि जखमी साप मुंगूस पशु पक्षी राष्ट्रीय पक्षी मोर विहिरीत पडलेल्या रानमांजर कोल्हा उदमांजर आणि साप अशे वन्यजीव वाचवण्यात मोलाची भूमिका घेतली, या कार्याची दखल घेऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले बरेच वर्ष पासून सर्पमित्र विजय बडोदे हे सामान्य जनतेत साप व गैरसमज या विषय वर उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सर्पतज्ञ निलिमकुमार खैरे पुरस्काराने गौरविण्यात आले . सर्पमित्र यांचे मोलाचे कार्य बघता प्रत्येक जिल्ह्यात जाऊन भेट देणार असे सर्पतज्ञ निलिमकुमार खैरे यांनी सांगितले. या वेळी प्रमुख उपस्तिथी वन्यजीव पशुपक्षी संरक्षण सामाजिक संस्था चे अध्यक्ष सुरेखा बडदे , सचिव विनायक बडदे , सर्प अभ्यासक अनिल खैरे , देवदत्त शेळके , मानद वनरक्षक आदित्य परांजपे , अति आयुक्त उल्हास जगताप , दादासाहेब नरळे, अति आयुक्त जितेंद्र वाघ , अग्निशामक प्रमुख किरण गावंडे , अनिल राऊत पाणीपुरवठा प्रमुख प्रवीण लडकत उपस्थित होते .
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment