नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथील सौ. कमलाबाई माणिकचंद कासलीवाल प्राथमिक विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी परिसराची स्वच्छता करून आवारातील झाडांचा पालापाचोळा प्लास्टिक व कागद यापासून तयार केलेल्या होळीचे दहन करून होळी सण साजरा केला. यात मुलांनी वाईट रूढी परंपरा, अनिष्ट प्रथा,राग, द्वेष, मत्सर, आळस,मी पणा,गर्व, अंधश्रद्धा,अहंकार,वाईट गुण यांचे तक्ते बनवून त्यांचे होळीत दहन केले. श्रीमती चोळके मॅडम यांनी होळी या सणाविषयी माहिती सांगितली. नंतर त्याच पद्धतीने आपल्या मधील वाईट गोष्टी होळी च्या माध्यमातून समूळ नष्ट कराव्यात हा संदेश दिला. यावेळी मुख्याध्यापक व्ही.पी. सावंत माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक गोरख डफाळ उपस्थित होते.
प्रशासन अधिकारी पी.पी. गुप्ता, चेअरमन सुनील कुमार कासलीवाल, श्री.विजय चोपडा, श्री.महेंद्र चांदिवाल या सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले. शिक्षक सिद्धार्थ जगताप, अभिजीत थोरात, विजय जाधव,धन्वंतरी देवरे, निलोफर पठाण, जयश्री चोळके,अनिता पवार, वैशाली शिंदे आदींनी परिश्रम घेतले. अशाप्रकारे होळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
No comments:
Post a Comment