Sunday, March 13, 2022

नांदगाव येथील शिवस्फूर्ती मैदानावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे नुतनीकरण लोकार्पण सोहळा संपन्न


नांदगांव(प्रतिनिधी ):-  काल  दि. १३ मार्चला नांदगाव येथील शिवस्फूर्ती मैदानावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या थाटामाटात छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते पार पडला यावेळी हत्तीवरून मिरवणूक काढन्यात आली मोठ्या बग्गीतुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली.ढोल ताशे लेझीम पथक मर्दानी खेळ या सर्व शिवकालीन खेळात भव्यदिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.आज करण्यात आलेल्या या सोहळ्याचे संभाजीराजे यांनी कौतुक करत छत्रपती घरण्यावर असेच प्रेम कायम ठेवावे असे  अवाहन केले.यावेळी त्यांची लाडूने तुला करण्यात आली.या अभूतपूर्व सोहळ्यासाठी शिवप्रेमी जनता मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
             नांदगांव येथील शिवस्फूर्ती मैदानावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची दुरवस्था झाली होती यासाठी शिवकन्या संगीता सोनवणे यांनी आमरण उपोषण केले याची तात्काळ दखल आमदार सुहास कांदे यांनी घेतली व तत्काळ 20 लाख रुपये मंजुर करून सुसज्ज असे मंदिर व सोन्याचा मुलामा असलेली मूर्ती बनवण्यात आली याचा लोकार्पण सोहळा आज छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते करण्यात आला.यावेळी हत्तीवरून मिरवणूक ढोल ताशे लेझीम पथक मर्दानी खेळ या सर्व शिवकालीन खेळात भव्यदिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.यावेळी मंचावर येताच सर्व जनतेने छत्रपती संभाजीराजे यांचे हात उंचावून स्वागत केले यानंतर काशिवरून आलेल्या पुजारी यांनी विधिवत अभिषेक पूजा केली.
यानंतर आमदार सुहास कांदे यांनी छत्रपती संभाजीराजे यांचा नांदगांव तालुक्यातील जनतेच्या वतीने चांदीची तलवार देऊन सत्कार केला.यावेळी आमदार कांदे यांनी प्रास्ताविक करताना मराठा समाजाच्या मागण्यासाठी कोल्हापूरवरून आदेश येताच आमदारकीचा राजीनामा देईल असे उद्गार काढले यावेळी उपस्थितीपानी जोरदार टाळ्या वाजवत स्वागत केले.यावेळी मंचावर नांदगांव नगराध्यक्ष राजेश कवडे,जेष्ट नेते बापूसाहेब कवडे,माजी आमदार राजेंद्र देशमुख,अल्ताफ खान,साईनाथ गिडगे,विनय आहेर,विलास आहेर,अंजुम कांदे,गणेश धात्रक,तेज कवडे,पिंटू शिरसाठ मयूर बोरसे,किरण देवरे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,

नांदगाव (प्रतिनिधी ) -  शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....