नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यातील कासारी येथील आकाश रविंद भाबड या सर्व सामान्य शेतकरी पूत्राने आंतरराष्ट्रीय पातळीवर रेकाॅडॆ केल्या बद्दल शिवसंस्कार संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी अध्यक्ष स्थानी संस्कृती रक्षक केंद्रा चे संस्थापक दत्तराज छाजेड हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जायटंस चे राज्य संचालक ज.का.सांळूखे, रविंद्र भाबड, परसराम सरोदे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन व आयोजन शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुमित गुप्ता यांनी केले.
नांदगांव तालुक्यातील कसारी गावातील आकाश भाबड ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंट प्रशिक्षणाचा सुरु झालेला प्रवास आता आंतरराष्ट्रीयस्तारावर पोहोचला आहे. त्यांनी नुकताच 22 देशातील एज्यूकेटर्स एकत्र आणण्याचा कार्यक्रम झाला. त्यात भारतासह, अमेरिका, कॅनडा, ग्रीस, अजेंटिना, मलेशिया, इटली, रोमानिया, आमेंनिया, तैवान, पेरु, मॉरिशस, रशिया, जॉर्जिया, लेबनॉन, भूतान, बाझिल, मॅसेडोनिया, दक्षिण अफ्रीका, बांगलादेश, नायजेरिया आणि श्रीलंका या देशातील एज्युकेटर्स सहभागी झाले होते. हा विश्व विक्रम ठरला म्हणावे लागेल. जगातील विविध देशांतील एज्यूकेटर्स एका व्यासपीठावर आणण्याचे आणि शिक्षणाविषयी त्यांचे विचार व्यक्त करण्याचे अनुभव यावेळी व्यासपीठ निर्माण झाले होते. त्यासाठी तारीख 22/02/2022 निवडण्यात आली होती. या कार्यक्रमात विविध देशांतील तंज्ञानी त्यांचे अनुभव ज्ञान, यशाची रहस्ये, शिक्षण, शिक्षण पद्धती आणि शिक्षकांच्या प्रति दृष्टिकोण मुलाखतीच्या माध्यमातून जगासमोर ठेवला. या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व उपक्रम क्रमांक 22 आणि 2 शी संबंधित होते. या कार्यक्रमात सहयोगी भागीदार कंपनी 'भाबड इंटरनॅशनल पब्लिकेशन' ने याप्रसंगी 8 पुस्तके प्रकाशित केली. यामध्ये भारतासह आर्मेनिया, झिम्बाब्वे आणि रोमानिया येथील लेखकांचा समावेश होता. आकाश भाबड हे स्वतः लाईफ कोच आणि बिझनेस कोच म्हणून काम करतात. ते ऑथर्स सक्सेस कोच सुद्धा आहेत. या कार्यक्रमात सहभागी होणारे सर्व शिक्षक अनुभवी आणि आपापल्या देशांतील अव्वल शिक्षकांच्या यादीत समाविष्ट आहेत. आगामी काळात आकाश भाबड असे विश्वविक्रम करणार असल्याचे नमूद केले. त्यांनी 12 डिसेंबर 2021 रोजी 12 लेखक, 12 देशांतील 12 ज्ञान मार्गदशक 12 राज्यातील 12 जिल्ह्यातील 12 मार्गदर्शक आणि 12 शहरातील 12 मार्गदशकांची 12 तासांची परिषद आयोजित केली होती. यावेळीह नामवंत लेखकांची 12 पुस्तक प्रकाशित करण्यात आले होते.
जगातील तज्ञ एज्युकेटर्स कोच आणि विविध क्षेत्रातील नेतृत्व एकत्र करण्याचे काम म्हणून भाबड यांच्या कार्याची दखल ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डर्सने घेतली आहे. त्यांच्या 20 डिसेंबर 2021 रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित गौरविण्यात आले होते. शेतकरी कुटुंबातील मुलगा परंपरागत शेती व्यवसाय करुन अंतरराष्टीय स्तरावर कार्यरत आसल्याने तालुक्याचा नावालौकिक वाढला. तसेच कुटुबालाही अभिमानास्पद कामगिरी असल्याचे भाबड यांचे वडील रविंद्र भाबड यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment