Wednesday, March 9, 2022

नांदगाव नगरपरिषदतर्फे ८ मार्च जागतिक महिला दिवस उत्सवात साजरा



नांदगांव( प्रतिनिधी ) -  नांदगाव नगरपरिषद नांदगाव येथे दिनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत मुख्याधिकारी तथा प्रशासक  विवेक धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ८ मार्च जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्यात महिलांसाठी माझी वसुंधरा या विषयावर आधारित काव्य वाचन स्पर्धा ,उखाणे स्पर्धा,प्रश्नमंजुषा स्पर्धा,इ.  स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यातून विजेत्या माहिला स्पर्धकाना नांदगाव नगरपरिषद मार्फत प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच माझी वसुंधरा व स्वातंत्र्यचा अमृत महोत्सव या अभियानांची जनजागृती करण्यात येऊन माझी वसुंधरा अभियानातर्गत सर्व महिलांना  हरित शपथ देण्यात आली. सदर कार्यक्रमात महिला पोलीस कर्मचारी श्रीमती.रंजना शिंदे, श्रीमती मोनाली ठाकरे, श्रीमती संध्याराणी कोकाटे, आशा वर्कर नलिनी काकळीज, सामाजिक कार्यकर्त्या संगीता सोनवणे, माझी वसुंधरा अंतर्गत सर्वोत्कृष्ट परसबाग श्रीमती .शोभा कैलास मांडवडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सर्वोत्कृष्ट व्यवसाय बचत गट- सिद्धेश महिला बचत गट, उत्कृष्ट बचत गट- दुर्गा महिला बचत गट, माझी वसुंधरा अभियानातर्गत सक्रीय बचत गट म्हणून गंगेश्वर महिला बचत गट या बचत गटांना भेट वस्तू व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.त्याच प्रमाणे महिला सफाई कर्मचारी संगीता दादू गुढेकर, माया काशिनाथ भालेकर, वैशाली पवार, मालन भालेकर यांचा सत्कार करून गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती.डॉ.योगिता चव्हाण यांनी महिलांना आरोग्यदायी जीवन कसे जागावे या बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या श्रीमती.विद्या कसबे यांनी महिला सुरक्षा व सबलीकरण या मुद्यावर उपस्थित नांदगाव शहरातील बचत गटातील महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास मुक्ता कांदे-कुटे (प्रशासकीय अधिकारी), रोशनी मोरे (संगणक अभियंता ), राहुल कुटे (कर निरीक्षक ), विजया धनवट(समूह संघटक), बीजला गंगावणे (क्षत्रिय समन्वयक,माविम)  दिपक वाघमारे  इ. उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री.आनंद महिरे (सहा.प्रकल्प अधिकारी) यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होणे कामी एकविरा,नांदेश्वरी,निलांबरी,सारनाथ,ज्ञानज्योती,निर्मिती,वैष्णवी इ वस्तीस्तर संघातील सदस्य व पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

No comments:

Post a Comment

नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,

नांदगाव (प्रतिनिधी ) -  शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....