Monday, April 11, 2022

मांडवडच्या जनता विद्यालयात महात्मा ज्योतीबा फुले यांची १९५ वी जयंती साजरी



मांडवड ( प्रतिनिधी ) -  मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मांडवड हायस्कूलमध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची साजरी करण्यात आली याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक खैरे आर जी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गावातील ज्येष्ठ नेते संस्थेचे सभासद विठ्ठल आबा आहेर,शिवबा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व स्कूल कमिटीचे उपाध्यक्ष अशोक निकम ,पगार के.जे.,श्री गावित,श्री शेख,निलेश वाळके,शरद सातपुते आदी उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली मंचावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानिमित्ताने विद्यालयातील शिक्षक गोटे पी.डी,श्री.रायते, आपल्या मनोगतातून
महात्मा ज्योतीबा फुले यांच्याबद्दल समग्र लिखाणातून आणि त्यांनी सुरू केलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीच्या दिशेवरून त्यांना अभिप्रेत असलेल्या भावी समाजाच्या स्वरूपाची कल्पना येते. सामाजिक व आर्थिक समतेवर आधारलेला शोषणविरहित असा समाज निर्माण करण्याचे ज्योतीबांचे स्वप्न होते. धर्माच्या आधारे निर्माण झालेली सामाजिक विषमता नष्ट झाली पाहिजे व सर्वजण मानव म्हणून एकत्रित आले पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता.
 अध्यक्षीय मनोगतातून खैरे आर.जी  यांनी ज्योतीबा फुले यांच्याबद्दल आपले विचार प्रकट केले फुले हे धर्मविरोधक नव्हते. परंतु त्याकाळी धर्माला आलेले विकृत स्वरूप, कर्मकांडाचे व पुरोहित वर्गाचे प्राबल्य व लोकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन केली जाणारी धार्मिक पिळवणूक त्यांना मान्य नव्हती. म्हणून मानवतावादाचा पुरस्कार करणाऱ्या एका नव्या धर्माची ‘सार्वजनिक सत्यधर्माची’ कल्पना त्यांनी पुढे मांडली. शूद्रांतिशूद्रांची सामाजिक दास्यातून मुक्तता व्हावी, जातिभेद व अस्पृश्यता नष्ट व्हावी असे जसे त्यांना वाटत होते, तसेच पुरुषांनी लादलेल्या रूढींच्या जोखडांतून स्त्रियांची मुक्तता व्हावी असेही त्यांना मनोमन वाटत होते. जिथे स्त्रियांना पुरुषांइतके स्वातंत्र्य व हक्क उपभोगता येऊ शकतील अशी समाजरचना त्यांना निर्माण करावयाची होती.
उत्पादक श्रमांचे माहात्म्य ज्योतिबांना पटलेले होते. समाजातील परोपजीवी वर्गाची निर्मिती आर्थिक शोषणाच्या प्रक्रियेतून निर्माण होते व या वर्गाचे समाजातील अस्तित्व आर्थिक शोषणाच्या प्रक्रियेचे सातत्य टिकविण्यास कारणीभूत होते असा त्यांचा दृढविश्वास होता. समाजातील उत्पादक श्रम करणाऱ्या वर्गाला योग्य संरक्षण देऊन सामर्थ्यवान केले तर समाजातील आर्थिक शोषणाचे उच्चाटन करणे शक्य होईल असा त्यांचा विश्वास होता. या नव्या समाजरचनेत उत्पादक श्रम करणाऱ्यांचे प्राबल्य असावे असे त्यांना वाटत होते.
 ज्योतीबांना अभिप्रेत असलेल्या सत्यशोधक समाजाचे पाईक होणे, सत्यधर्माचे पालन करणे, आपणा सगळ्यांकडून त्यांना हीच खरी आदरांजली आहे . 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत परदेशी यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप आहेर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक समितीतील सर्व सदस्य शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी श्री .कोल्हे,श्री.आहेर एन.ए, श्री वर्पे यांनी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment

नांदगाव येथील विद्यालयात 'अत्याधुनिक संगणक लॅब' तून विद्यार्थ्यांना संगणकीय धडे मिळणार,

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील नाशिक शिक्षण प्रसारीत मंडळ संचलित स्व. मिश्रीलाल  भिकचंद छाजेड विद्यालयात नूतनीकरण करण्यात ...