नांदगाव ( प्रतिनिधी ):- राज्यात सध्या शिवशाहीचे राज्य आहे, मुख्यमंत्री शिवसेनेचे तसेच मित्रपक्ष अर्थात महाआघाडी सरकार हे शिव फुले शाहु आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणारे आहेत तरीही या राज्यांमध्ये स्वराज्य स्थापनेत महत्वाचे योगदान असणाऱ्या युवराज छत्रपती संभाजी राजे यांची जयंती शासकीय कार्यलयात साजरी केली जात नसल्याची खंत नांदगांव येथील शिवकन्या सौ संगीता सोनवणे यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली असुन त्वरित राज्य सरकारने अध्यादेश काढून शासकीय परिपत्रकात युवराज छत्रपती संभाजी राजे यांची जयंती साजरी करण्यात यावी असे आदेशच परित करावे व हे खरोखरच रयतेचे राज्य असल्याचे दाखवून द्यावे अशी मागणी केली आहे.
संगिता सोनवणे या गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांची रोज न चुकता मनोभावे व स्वखर्चाने स्वच्छता व आरती करतात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर जर स्वराज्याची लढाई कोणी लढली असेल तर ती युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी याची इतिहासात नोंद असतांना देखील राज्य सरकारने संभाजी राजे यांची जयंती अद्यापही शासकीय कार्यलयात साजरी करण्यासाठी आदेश दिलेलं नाहीत याची खंत व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे, पत्रात त्यांनी म्हटले आहे की महाराष्ट्र राज्य हे शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणारे राज्य आहे.महाराष्ट्रात राज्य सरकारचे काम आपल्या नेतृत्वाखाली अगदी उत्तम सुरू असुन शिव फुले शाहू आंबेडकर यांच्यासह सर्वच महापुरुष जयंती आपण शासकीय कार्यलयात साजरे करण्यासाठी परिपत्रक काढले आहे.महोदय मला आपणास सांगण्यास खेद वाटतो की छत्रपती संभाजी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर महराष्ट्रात स्वराज्याची पताका फडकविण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा थोर महायोध्दा ज्याचे कार्य साता समुद्रा पार आहे त्या राजांची जयंती आपण शासकीय कार्यलयात साजरी करत नाही हा अन्याय असुन आपण आपल्या स्तरावर त्वरित छत्रपती संभाजी राजे यांची जयंती सर्व शासकीय कार्यलयात साजरी करण्यासाठी परिपत्रक काढावे व राज्याच्या जनतेला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.तसे निवेदन देखील त्यांनी नांदगांव नगर पालिकेला दिले आहे.
--------------------------------------------------------------
राज्यात शिवशाही असतांना असे होणे अपेक्षित नाही...!
राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा जपणारे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस मित्र पक्षाचे सरकार आहे थोडक्यात राज्यात शिवशाही आहे तरीही स्वराज्य स्थापन करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या युवराज छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंतीचा साधा उल्लेख शासकीय परिपत्रकात नसल्याने वाईट वाटते मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देऊन जयंती साजरी करण्यासाठी अद्यादेश काढण्याची मागणी केली आहे.ठाकरे सरकार नक्की न्याय देईल अशी आम्हाला खात्री आहे.
-सौ. संगीता सोनवणे, शिवकन्या नांदगांव
No comments:
Post a Comment