Friday, June 10, 2022

नांदगांव मध्ये आधार बहुउद्देशीय संस्थेच्या वतिने नाशिक जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांना निवेदन

नांदगाव ( प्रतिनिधी)- नांदगावमध्ये नाशिक जिल्हाधिकारी नांदगावच्या दोऱ्यावर आले असता,  नांदगांव मध्ये आधार बहुउद्देशीय संस्थेच्या वतिने  जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनण म्हटले की,"  गेल्या कित्येक वर्षापासून नांदगाव शहरांमध्ये 3 अंगणवाडी आहेत,  त्याची संख्या वाढवावी व पोषण आहार उपलब्ध करून देण्यात यावा.  नांदगाव शहरामध्ये अनुदानित शाळा फी च्या नावाने पालकांची लूट करत आहेत यावर प्रशासकीय नियंत्रण ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.  गेल्या दोन वर्षापासून खावटी योजनेचे फॉर्म भरलेले असताना देखील अजूनही काही आदिवासी बांधवांना खावटी योजनेचा लाभ मिळालेला नाही त्या बांधवांना लवकरात लवकर या योजनेचा लाभ मिळवून देण्याची मागणी करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बाल संगोपन योजना व संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणं लवकरात लवकर मंजूर करण्यात यावी तसेच रेशन कार्डधारकांना 12 अंकी नंबर देण्यात यावा जेणेकरून त्यांना धान्य मिळेल असे निवेदन मागणी करण्यात आली.
          जिल्हाधिकारीनी या सर्व विषयांवर अॅड. विद्या कसबे यांच्या सोबत चर्चा केली व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले  यावेळी सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते . या निवेदनावर एडवोकेट विद्या कसबे,  शबाना मंसूरी, छाया  आवारे, प्रतिभा पवार, राणी सोनवणे , अक्काबाई राजोळे, गीता शिंदे, नेहा कोळगे, प्रमिला माळी, आदींच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment

नांदगावच्या व्हि.जे. हायस्कूल येथे नायलॉन मांजा न वापरण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ,

नांदगाव ( प्रतिनिधी ) -   नांदगाव येथील   व्ही.जे. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी व हरित सेनाप्रमुख, पर्यावरणप्रेमी  ...