प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करताना नियंत्रक अधिकारी तेजस चव्हाण,
नांदगाव ( प्रतिनिधी)- आज आगामी निवडणुकीसाठी नांदगाव नगरपरिषदेच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम संपन्न झाला. निवडणुकीसाठी चिठ्ठया टाकून जागांचे आरक्षण निश्चत करण्यासाठी नांदगावच्या व्ही.जे.हायस्कुल मधील विद्यार्थीनी समृध्दी राजेद्र पाटील व यश उमेश चंडाले या मुलांच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली. आरक्षण अनुसूचीत जातीकरीता ४ जागा राखीव असून तर १ जागा अनुसूचीत जमातीसाठी, महिलासाठी १० राखीव ठेवण्यात आल्या. प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यासाठी नियंत्रक अधिकारी तेजस चव्हाण उपस्थित होते. या आरक्षण सोडत, निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानूसार १ ते १० प्रभागाचे आरक्षण निश्चीत करण्यात आले. आगामी निवडणुकीत १० प्रभाग असुन यापुढे नव्या प्रभागरचनेनुसार नगरपरिषदेत २० सदस्यसंख्या असतील. आधी सदस्यसंख्या १७ होती. प्रत्येक प्रभागात दोन सदस्य निवडुन येतील. निवडणुकीसाठी असणारे आरक्षण जाहीर झाल्याने ईच्छुकांनी नेतेमंडळी कडे भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. महिलासाठी १० राखीव जागा असल्याने पुढील समीकरणे काय असेल येणारा काळ ठरवेल.
नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक २०२२ चे आरक्षण पुढील प्रमाणे-
(प्रभाग १) - १अ - अनुसुचीत जाती,
१ ब- सर्वसाधारण (महिला),
(प्रभाग २ )-२ अ - अनुसुचीत जाती,
२ब- सर्वसाधारण (महिला),
(प्रभाग ३) ३अ- अनुसुचीत जाती(महिला),
३ब - सर्वसाधारण,
(प्रभाग ४) - ४अ- सर्वसाधारण (महिला) ,
४ब- सर्वसाधारण,
(प्रभाग ५)- ५ अ- सर्वसाधारण (महिला),
५ब - सर्वसाधारण,
(प्रभाग ६) - ६अ - सर्वसाधारण (महिला),
६ ब - सर्वसाधारण ,
(प्रभाग ७) - ७अ- अनुसुचीत जमाती,
७ब - सर्वसाधारण (महिला) ,
( प्रभाग ८)- ८अ- सर्वसाधारण (महिला) ,
८ ब - सर्वसाधारण,
(प्रभाग ९) - ९अ- अनुसुचीत जाती (महिला), ९ब- सर्वसाधारण,
(प्रभाग १०) - १०अ- सर्वसाधारण(महिला) , १०ब- सर्वसाधारण अशी आहे.
No comments:
Post a Comment