नांदगाव (प्रतिनिधी) - ओबीसी एम्पीरिअल डाटा समर्पित आयोगा मार्फत सदोष पध्दतीने होत असल्याबाबत समता परिषदे कडून तहसीलदारांना डॉ सिद्धार्थ मोरे यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे कि सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशाने महाराष्ट्रात बाठीया यांच्या अध्यक्षते खाली समर्पित आयोग गठीत करण्यात आला असून सदर आयोगाने ओबीसी एम्पिरिएल डाटा घरोघर जावून ओबीसी ची खरी आर्थिक, सामाजिक , राजकीय स्थितीची माहीती संकलीत होणे अपेक्षीत आहे. पंरतू आमचे असे निर्दशनास आले आहे की आयोग वरील पद्धतीने माहीती संकलीत न करता सॉफ्टवेअर द्वारे आडनावा नुसार सदोष पद्धतीने डाटा संकलीत करीत आहे. ही समस्त ओबीसी समाजाची फसवणूक आहे. व यात ओबीसी समाजाचे कधीही भरून न येणारे नुकसान होणार आहे.
म्हणून समर्पित आयोगाचे कामकाज त्वरीत थांबवून सदरचे काम तलाठी ' ग्रामसेवक ' आशा वर्कर' अंगणवाडी सेवीका यांचे मार्फत संकलीत करून शासना मार्फत सर्वोच्च न्यायलयात देण्यात यावा व ओबीसी समाजाला न्याय देण्याची मागणी करण्यात आली.
मागणी पूर्ण झाल्यास समता परिषद राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल. या निवेदनावर समता परिषद शहराध्यक्ष शिवा सोनवणे, दीपक भाऊ खैरनार, अशोक पाटील, महेश पवार, शंकर शिंदे, दया जुन्नरे, सुरेश गायकवाड, नगरसेवक वाल्मिक टिळेकर, प्रतीक कोरडे, अरबाज शेख, सलमान पठाण, सागर शिंदे, सुरज कमोदकर, सचिन जेजुरकर, मोसिम शेख, सचिन सोमासे, सचिन देवकते, मुकुंद खैरनार, राहुल नाईक, भरत जाधव, राजूभाऊ लाठे, गौतम जगताप, बाळासाहेब महाजन, सुधाकर निकम, चिंधा बागुल, बाळासाहेब महाजन, प्रशांत पाटील, राजूव बागुल, बाळासाहेब खैरनार आदीच्या सह्या आहेत.
No comments:
Post a Comment