नांदगाव (प्रतिनिधी)- नांदगाव तालुक्यातील मांडवड मध्ये मराठा विद्या प्रसारक समाज संचलित जनता विद्यालयात "विद्यार्थी प्रवेशोत्सव"उत्साहात साजरा करण्यात आला. पहिल्याच दिवशी नांदगाव बस आगाराच्या वतीने सर्व शिक्षा अभियानांतर्गत बस सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी नांदगाव आगाराचे डेपो मॅनेजर विश्वासराव गावित व कंट्रोलर विनोद इपर यांच्या कार्यतत्परतेमुळे पहिल्याच दिवशी बससेवा सुरू झाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण बघावयास मिळाले. या प्रसंगी चालक खैरे व वाहक सोनवणे यांचा मांडवड ग्रामस्थ व जनता विद्यालय मांडवड यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तक व गुलाब पुष्प देऊन नवीन विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले, करून सदर कार्यक्रमासाठी गावातील ज्येष्ठ नेते विठ्ठलआबा आहेर, शालेय स्कूल कमिटीचे अध्यक्ष मा.माधव दादा काजळे , मांडवडे गावचे सरपंच अंकुश डोळे, शिक्षणतज्ञ गावित , मुख्याध्यापिका कांबळे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक हेमंत परदेशी यांनी केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगावच्या व्हि.जे. हायस्कूल येथे नायलॉन मांजा न वापरण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ,
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव येथील व्ही.जे. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी व हरित सेनाप्रमुख, पर्यावरणप्रेमी ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुका हा शांतताप्रिय तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात जातीवा...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - एकमेकांच्या सुखदुःखात कुटुंबंांची एकी कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे नांदगाव शहरातील गुप्ता कुटुंबं...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - ए.एच.सी अकादमी मालेगाव तर्फे दि. २१ जानेवारी रोजी ए.एच.सी टॅलेंट हंट परीक्षेचं आयोजन करण्यात आले होते. या...
No comments:
Post a Comment