नांदगाव/ मनमाड (प्रतिनिधी )- मराठीत एक म्हण प्रसिद्ध आहे "सरकारी काम अन दोन महिने थांब" या म्हणीचा प्रत्यय नांदगांव तालुक्यातील जनतेला येथे असलेल्या सगळ्याच कार्यालयात मिळत आहे.याचे कारण असे की येथे असलेल्या तहसील कार्यालयापासुन ते पोलिस ठाण्यापर्यंत या सर्वच ठिकाणी मंजूर असलेल्या पदसंख्येच्या निम्म्याहून जास्त पद हे रिक्तच आहे यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काम करावी लागत आहेत यामुळे नागरिकांना वेळेत काम मिळत नसल्याने नाराजीचा सुर निघत आहे तर रिक्त असलेल्या पदांची त्वरित पूर्तता करावी अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.
नांदगांव तालुक्यातील लोकसंख्या बघता येथे असलेल्या प्रत्येक शासकीय कार्यलयात आधीपासूनच मंजूर असलेली संख्या कमी आहे त्यात मंजूर असलेल्या संख्येच्या निम्मे पद हे रिक्त आहेत.यामुळे तहसील कार्यालयातुन मिळणारे शैक्षणिक दाखले,यासह विविध कामासाठी लागणारे दाखले दिलेल्या मुदतीत मिळत नाही यासह भूमिअभिलेख कार्यलय असो वा सरकारी दवाखाने किंवा नगर परिषद या सर्वच ठिकाणी अधिकारी कर्मचारी यांची पदसंख्या रिक्त आहे.यामुळे कामांना गती मिळत नसुन नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.जे अधिकारी कर्मचारी आहेत तेदेखील मनमानी पध्दतीने काम करत असल्याने प्रत्येक किरकोळ कामासाठी आता लोकप्रतिनिधी पर्यंत जाण्याची वेळ नागरिकांवर येऊन ठेपली आहे.काही विभागाचे कर्मचारी हे भरतीच्या दिवसापासून प्रतिनियुक्तीवर नाशिक येथे काम करतात ते करतात की नाही हा संशोधनाचा विषय ठरू शकतो.हे कुठेतरी थांबले पाहिजे योगायोगाने दिंडोरी लोकसभा मतदार संघात नांदगांव तालुका येत असल्याने या मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या खासदार डॉ भारती पवार या केंद्रीय मंत्री आहेत तर दमदार आमदार सुहास कांदे हेदेखील कामाच्या बाबतीत गंभीर आहेत आता या दोघांनीच नांदगांव तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालयातील रिक्त असलेली पदे भरुन तालुक्यातील जनतेला न्याय द्यावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून केली जात आहे.
--------------------------------------------------------------
वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक...!
कोणत्याही शासकीय कार्यालयातील प्रमुख अधिकारी किंवा वरिष्ठ अधिकारी यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक असते यासाठी सरकारी योजेतून त्यांना शासकीय निवासस्थान असते यावर लाखो रुपये शासन खर्च करते मात्र तालुक्याचे दुर्दैव असेंकी येथील एकही अधिकारी हा मुख्यालयी राहत नाही आपत्कालीन स्थितीत येथे असलेल्या शिपाई किंवा क्लर्क यांना वेळ मारून न्यावी लागते.एकतर यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करावे किंवा यांना आजपर्यंत देण्यात आलेले विविध टीए डीए याची व्याजासकट वसुली करावी.
--------------------------------------------------------------
नांदगांव तालुक्यातील तहसील कार्यालयापासुन ते पोलिस स्टेशनसह सर्वच सरकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणावर पद रिक्त आहेत,यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त पदभार देण्यात येतो यामुळे त्यांचे काम अर्धे अतिरिक्त पदभार असलेले काम अर्धे यामुळे नागरिकांचे काम प्रलंबित राहतात याचाच काही लोक फायदा घेऊन पैशाची मागणी करून गोरगरीब जनतेकडून पैसे घेऊन काम केली जातात हे कुठेतरी थांबले पाहिजे आम्ही स्वतः केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्याकडे तालुक्यातील सर्व रिक्त पद भरण्यासाठी निवेदन देऊ पद भरले म्हणजे नागरिकांना सुविधा मिळतील.
- जयकुमार फुलवानी, शहराध्यक्ष भाजपा.
--------------------------------------------------------------
नांदगांव तालुक्यातील विविध सरकारी कार्यालयातील रिक्त पदसंख्या....
●कार्यालय नाव ●मंजुर संख्या ●उपलब्ध ●रिक्त
नांदगांव तहसील ४४ ३५ ०९
कार्यालय
______________________________________
पंचायत समिती १०७६ ८१४ २६२
कार्यालय
______________________________________
सार्वजनिक बांधकाम १५ १२ ०३
विभाग
______________________________________
मनमाड शहर पोलिस १३२ ५४ ७८
स्टेशन
______________________________________
नांदगांव शहर पोलिस ५६ ३६ २०
स्टेशन
______________________________________
मनमाड नगर परिषद ३० १४ १६
______________________________________
नांदगांव नगर परिषद १३ ०५ ०८
______________________________________
भूमिअभिलेख कार्यालय २३ १६ ०७
______________________________________
नांदगांव तालुका वैद्यकीय १२८ ६६ ६२
विभाग
______________________________
No comments:
Post a Comment