नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव शहरातील व्ही.जे.हायस्कूल मधील २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षातील घेण्यात आलेल्या परीक्षेचा मार्च २०२२ चा एसएससी निकाल नुकताच जाहीर झाला. या वर्षी ही चांगल्या निकालाची परंपरा कायम ठेवली आहे .शाळेचा निकाल ९६.२८ टक्के लागला यात सिध्दीका योगेशकुमार वडगावकर ९७ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे त्याच प्रमाणे रोहन सुधाकर खैरनार ९५.२०टक्के गुण मिळवून व्दितीय क्रमांक तर खुशी प्रवीण निकम ९४.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. तर चैताली प्रकाश जैन यांनी ९२.४०टक्के गुण मिळवून चौथा क्रमांक व आकांक्षा आशिष रत्नपारखी हीने ९२.२० टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळविला.या वर्षी २५९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यातील १९ विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा जास्त टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले तसेच विशेष श्रेणीत १३२ विद्यार्थांनी उत्तीर्ण झाले.
या सर्व यशस्वी विद्यार्थाचे संस्थेचे कार्याध्यक्ष राजेंद्रजी कलाल, सचिव आश्विनीकुमार येवला, शालेय समिती अध्यक्ष संजीव धामणे ,मुख्याध्यापिका जोत्स्ना आव्हाड , उपमुख्याध्यापक मनोहर बडगुजर , पर्यवेक्षक मनोहर शिंदे ,टी.एम.भैय्यासाहेब चव्हाण ,भास्कर मधे, वर्ग शिक्षक दिपाली सांगळे,गुलाब पाटील,सुभाष लाड,व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment