प्रथम रितुजा भारत काकळीज (९२. ४०%)
द्वितीय यशस्वी चव्हाण (९१ . ४०%)
नांदगाव (प्रतिनीधी)- नांदगाव तालुक्यातील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वाखारी येथील किसान माध्यमिक विद्यालयातील ५७ विद्यार्थी १० वी एस एस सी बोर्डाच्या परिक्षेस बसले होते . विद्यालयाचा निकाल १०० % लागला असून रितुजा भारत काकळीज ९२. ४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रंमाक तर यशस्वी चव्हाण ९१ . ४० टक्के मिळवून द्वितीय क्रंमाक , स्नेहल चव्हाण ८९ . ४० टक्के मिळवून तृतीय क्रंमाक घवघवीत यश संपादन केले. विद्यालयातील ३८ विद्यार्थी विशेष श्रेणीत' १६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत ' ३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उतीर्ण झाले .
या सर्व यशस्वी विद्यार्थाचे संस्थेचे कार्याध्यक्ष राजेंद्रजी कलाल, सचिव अश्विनीकुमार येवला , शालेय समिती अध्यक्ष उमाकांत घोंगाणे , व्यवस्थापन समिती अध्यक्ष परशराम नागरे , मुख्याध्यापक संजय दिक्षित , वर्ग शिक्षक सुनील हिंगमिरे यांनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment